Nashik News: नांदूरशिंगोटे बसस्थानकाचे रुपडे पालटणार! नूतनीकरणासाठी 2 कोटी 11 लाख मंजूर

तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी ११ लाखांचा निधी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला आहे.
funding
fundingesakal
Updated on

सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी ११ लाखांचा निधी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला आहे.

यामुळे बसस्थानकाचे रुपडे पालटणार आहे. (Nandurshingote Bus Station will change face 2 crore 11 lakh sanctioned for renovation Nashik News)

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर व संगमनेरच्या सरहद्दीवर असलेले नांदूरशिंगोटे महत्त्वाचे गाव. येथे बाजार समितीचे उपबाजार, राष्ट्रीयकृत, सहकारी, खासगी बँका, विविध शासकीय कार्यालये असून, पंचक्रोशीतील २५-३० खेड्यांचे बाजारपेठेचे गाव म्हणून नांदूरशिंगोटेची ओळख आहे.

नांदूरशिंगोटे येथे नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर राबता आहे. नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. राज्य परिवहन

महामंडळाच्या बसे थांबण्यास कुचराई करतात. बसस्थानकात मुलभूत सुविधांचीही वाणवा आहे. बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांकडून सातत्याने होत होती.

funding
Shiv Jayanti 2024 : विश्व विक्रमी सुवर्ण होनचे काम अंतिम टप्प्यात; शिवजन्मोत्सवानिमित्त उपक्रम

नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकाचाही कायापालट करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे केली होती.

आमदार कोकाटे यांनी नांदूरशिंगोटे बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी तब्बल दोन कोटी ११ लाखांचा निधी शासनाकडून मिळविला असून, लवकरच बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, आमदार कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक शिवा वाणी यांनी दिली.

funding
Nashik Political: निफाडचे राजकारण वेगळ्या वळणावर! कार्यकर्त्यांची वैचारिक क्रांती दिशा ठरविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.