Nano DAP Fertilizer: नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपी शेतकऱ्यांना तारणार! पोत्यामागे 750 रुपये वाचणार

Nano DAP Fertilizer
Nano DAP Fertilizeresakal
Updated on

Nano DAP Fertilizer : यंदाच्या खरीप हंगामापासून देशातले पहिले द्रव्य रूपातील नॅनो डीएपी खत बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपी शेतकऱ्यांना तारणार आहे. (Nano Urea Nano DAP solve farmers problem 750 per sack will saved nashik news)

डीएपी हे बल्क स्वरूपात बॅगच्या माध्यमातून बाजारात उपलब्ध असले तरी ५० किलोची बॅग जमिनीत पाण्याच्या पुढे टाकायची आहे. पण नॅनो डीएपीचे तंत्रज्ञानात डीएपी पाण्यात मिसळून केलेले द्रावण हे झाडावर फवारायचे आहे.

नॅनो डीएपीचे पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठीचे प्रमाण आहे. हे द्रावण झाडांच्या पानावर पडल्यामुळे शोषणाच्या माध्यमातून झाडांना मिळणार असल्यामुळे अधिक परिणामकारक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

कारण जमिनीत टाकलेला डीएपी हा पाणी भरल्यानंतर विरघळून मुळांद्वारे झाडांना मिळत असतो. परंतु झाडाच्या मुळांची शोषणाची कार्यक्षमता जर कमकुवत झालेली असेल तर जमिनीत टाकलेला डीएपी हा विरघळून जमिनीत मुळांच्या कार्यकक्षबाहेर खालच्या थराला निघून जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nano DAP Fertilizer
NMC News: सर्वसामान्यांना वाकुल्या, धनदांडग्यांना ‘रेडकार्पेट’! श्रीमंतांच्या वावरातील रस्त्यासाठी 7 कोटी

त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांचे नुकसानच होते. नॅनो डीएपीचा वापर केल्यास पुन्हा जमिनीतून बल्क स्वरूपातील डीएपी देण्याची गरज नाही. यंदाच्या खरीप हंगामापासून बाजारात नॅनो डीएपी दाखल झाले असून शेतकऱ्यांना नॅनो युरियानंतर पहिल्यांदाच वापर करून अनुभव घेता येईल.

पिकांची जोमाने वाढ व्हावी, यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या तीन घटकांची आवश्यकता असते. डीएपीमध्ये हे तीनही घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असतात.

यामुळे दरवर्षी डीएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात होते, परंतु याचे दर अधिक असतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडते. यंदा प्रथमच नॅनो डीएपी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

यामुळे १ हजार ३५० रुपयांची खताची बॅग नॅनो डीएपीमुळे ६०० रुपयांत लिक्विडमध्ये बॉटल उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पोत्यामागे ७५० रुपये वाचणार आहेत.

Nano DAP Fertilizer
Social Unity: नगरसूलच्या रशीद शेख यांचा ऐक्याचा संदेश; बजरंगबलीच्या पुरातन मंदिरासाठी एक लाखाची देणगी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()