Narhari Zirwal News : जिल्ह्यातील पतसंस्थांचे कार्य समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे. पतसंस्थांच्या ठेवी जिल्हा बँकेत अडकलेल्या आहेत. याची जाणीव असून, जिल्हा फेडरेशन याबाबत सतत पाठपुरावा करत आले आहे.
मी स्वतः सहकारमंत्री व सहकार सचिवांसोबत बैठक घेऊन लवकरात लवकर पतसंस्थांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी पाठपुरावा करेल. त्यासाठी येत्या नागपूर अधिवेशनात देखील प्रयत्नशील राहील.
जिल्हा बँक वाचविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू असून, ठेवीसाठी मी स्वतः लढा देईल, अशी ग्वाही राज्याचे विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली. (Narhari Zirwal statement Efforts to get deposits from credit institutions in NDCC District Bank nashik)
नाशिक जिल्हा नागरी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्यादित नाशिकच्या वतीने इगतपुरी येथील रिलॅक्स कौंटी रिसॉर्टला आयोजित जिल्ह्यातील पतसंस्थांच्या पदाधिकारी, कर्मचारीवर्गासाठी एकदिवसीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
त्याप्रसंगी झिरवाळ बोलत होते. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर अध्यक्षस्थानी होते. ‘पर्यटनातून प्रशिक्षण’ संकल्पनेतून नाशिक जिल्हा फेडरेशनमार्फत आयोजित या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पाचशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ, माजी राज्यमंत्री, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, कार्याध्यक्ष नारायणराव वाजे, उपाध्यक्ष भारत कोठावदे, जनसंपर्क संचालिका डॉ. अश्विनी बोरस्ते आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आमदार खोसकर यांनी अध्यक्षीय भाषणात जिल्हा बँकेला स्थिर करण्यासाठी सत्ताधारी सरकारने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. सहा. निबंधक अर्चना सौंदाणे यांनी सहकारातील आधुनिक बदल स्वीकारणे ही गरज लक्षात घेण्याबाबत सांगितले.
उद्घाटनानंतर पहिले सत्र शेखर चरेगावकर यांचे झाले. त्यांनी पतसंस्थांची संख्यात्मक व गुणात्मक प्रगती व नियामक मंडळ सहकार कायदा कलम १४४ ची अंमलबजावणी विषयावर ठेवींना संरक्षण दिल्याशिवाय अंशदान देण्यात येऊ नये.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्हा फेडरेशनच्या माध्यमातून शासनस्तरावर लढा उभारण्यात आला तरी चालेल, असे स्पष्ट केले. दुसऱ्या सत्रात सोने तारण कर्जाबाबत घ्यावयाची काळजी, या विषयावर सीए संदीप सोनार यांनी माहिती दिली.
आनंदी जीवन जगण्याची कला विषयावर संगू गुरुजी यांनी संवाद साधला. सिक्युरिटी संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी पर्याय देत दीपक वाणी यांनी प्रभावी उपाय सांगितला.
नेटवीन सॉफ्टवेअरमार्फत डेटा सिक्युरिटी व डिजिटल प्लॅटफॉर्म यावर, तर गो-डिजिट इन्शुरन्स कंपनीच्या संचालकांनी पतसंस्थांच्या दृष्टीने गरजेच्या विम्याबाबत मार्गदर्शन केले. फिनकेअर बँकेच्या महाराष्ट्र हेड फ्रॅंकलिन यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी केले. संचालक व प्रशिक्षण समिती सदस्य दीपक महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष राकेश चव्हाण, उपाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, संचालक डॉ. शशीताई अहिरे, के. के. चव्हाण, शिवाजी पगार, अशोक व्यवहारे, सुनील केदार, अशोक शिरोडे, शशांक सोनी, अविनाश कोठावदे, महेश काबरा, तानाजी घुगे, राहुल कोतवाल, जी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते. वसुली अधिकारी सतीश पुणेकर, योगेश आहेर, प्रकाश पगार, रईस खान पठाण यांनी परिश्रम घेतले. विविध पतसंस्थांचे पाचशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.