Nashik News : नरकोळचा एकाच यंत्रातून सामुदायिक पिकाची मळणी करणारे गाव म्हणून होतोय उल्लेख!

A woman threshing millet in an open field here
A woman threshing millet in an open field hereesakal
Updated on

नरकोळ (जि. नाशिक) : कसमादे परिसर डोंगर नद्यांनी व्यापला आहे. डोंगरावर व पायथ्याशी शेती केली जाते. शेकडो कुटुंबीय ही आव्हानात्मक शेती वर्षानुवर्षे करीत आहेत. डोंगरावर शेती करून पीक काढण्यात ते माहीर आहेत.

नरकोळ परिसरातील असंख्य शेतकरी डोंगरावर व पायथ्याला शेती करतात. पिकाची काढणी मात्र पायथ्या नजीकच्या मोकळ्या जागेत केली जाते. त्यामुळे बाजरी, गहू हे पिके एकाच यंत्रातून मळणी करणारे गाव म्हणून नरकोळचा उल्लेख केला जातो. (Narkol being mentioned as village that threshes community crops with single machine Nashik News)

७०० ते ८०० लोकवस्तीचे छोटेसे गाव सटाणापासून पश्चिमेस तीस किलोमीटर अंतरावर आहे. येथे दरवर्षी बाजरी, गहू आदी पिके गावातील मोकळ्या मैदानावर सामुदायिकरीत्या मळणी केली जाते. वर्षानुवर्षे ही परंपरा कायम आहे.

पिकांची मळणी एकाच ट्रॅक्टरच्या मशिनद्वारे केली जाते. येथील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी या डोंगर उतारावर आहेत. डोंगर उताऱ्यावरून बाजरीचे कणसे डोक्यावर वाहून आणली जातात. मोकळ्या मैदानावर स्वतंत्रपणे ठेवून आपल्या मालाची काढणी येईपर्यंत दुसऱ्याला मदत केली जाते. एकमेकांच्या सहकार्याने हे काढणीचे काम सध्या जोरात सुरू आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

A woman threshing millet in an open field here
Nashik Political News: राजकीय पटलावर विधानसभेची व्यूहरचना; निफाडमधून दिग्गजांची राजकीय मशागत सुरू

शेतीकामात देखील एकमेकांना मदत

खळे पद्धत नामशेष झाल्यामुळे आता मळणी यंत्राचा सर्वत्र वापर केला जात आहे. पेरणी केल्यानंतर निंदणी, खुरपणी करून पाखरे उडविण्यासाठी एकमेकांचे सहकार्य देखील ग्रामस्थ नेहमी घेत असतात. एका कुटुंबासाठी एक ते दोन पोते बाजरी उतारावरील जमिनीतून सहज मिळते. यातून मळणी यंत्रधारकाला मोबदला मिळतो.

"आमच्या जमिनी डोंगर उताऱ्यावर आहेत. त्यामुळे एक- दोन पोते बाजरी डोंगरावर काढणे अवघड होते. कणसे डोक्यावर आणून एकाच ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे मळणी यंत्रातून आम्ही दरवर्षी एकमेकांच्या सहकार्याने बाजरीची मळणी करतो. कामातून एकोपाही टिकून राहतो."

- शिवमण सोनवणे, नरकोळ

A woman threshing millet in an open field here
Tribal Water Crisis : साधना गवळी यांनी 2 लाख रूपये स्वखर्चातून भागविली आदिवासी बांधवांची तहान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()