नारोशंकराची घंटा : ‘खाया पिया कुछ नही’

Bike Challan
Bike Challanesakal
Updated on

एका तरुणास पोलिस ठाण्यात काम होते. मित्राची दुचाकी घेऊन तो ठाण्यात आला. काम पूर्ण करून परतत असताना तरुणावर संशय असल्याने पोलिसांनी चौकशी केली असता, दुचाकी त्याची नसल्याचे आढळले. शिवाय लायसन्सदेखील नसल्याचे समजले.

पोलिसांनी दुचाकी जमा करून घेतली. दरम्यान, तरुणाने मित्राची दुचाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ज्याची दुचाकी आहे, त्यास कागदपत्र घेऊन बोलवण्यास सांगितले. काही वेळानंतर तो मित्र ठाण्यात आला. दुचाकी त्याचीच असल्याचे सांगितले. (naroshankarachi ghanta bike problem gives shock to friend nashik news)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Bike Challan
नारोशंकरची घंटा : असा होतो आवाज बंद!

परंतु, ज्याच्याकडे परवाना नाही, अशा व्यक्तीस दुचाकी चालवण्यासाठी दिली कशी, अशी विचारणा पोलिसांनी केली. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पोलिसांनी मात्र कर्तव्य बजावत त्यास पाचशे रुपयाचा अधिकृत दंड केला.

दंड भरण्यासाठी वाहतूक पोलिसाकडे पाठवले असता, त्यांच्याकडील यंत्रामध्ये यापूर्वी पाचशे रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचे आढळले. त्यामुळे पूर्वीचा आणि आत्ताचा असे दोन्ही दंड एकत्रित भरण्याची वेळ दुचाकी मालकावर आली

. कुठलाही संबंध नसताना एक हजाराचा दंड भरावा लागल्याने ‘खाया पिया कुछ नही ग्लास थोडा अठ्ठाना’ अशी म्हणण्याची वेळ मालकावर आली.

Bike Challan
नारोशंकरची घंटा : तुमच्यापेक्षा माझ्या कुत्र्याला कळतं कोणावर भुंकायच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.