नारोशंकराची घंटा : अन् रेशन दुकानदाराची सपशेल माघार...

File Photo
File Photoesakal
Updated on

सिडकोतील एका शासनमान्य स्वस्त धान्य दुकानात दारिद्य्र रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू होते.

त्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, काही तरुण-तरुणी रांगेत थांबून होते. शिधापत्रिकेवर असलेल्या मान्यतेनुसार दुकानदार धान्य वाटप करीत त्यांची नोंद घेत होता. एकापाठोपाठ एकेकाला धान्य वाटप केले जात असताना एका ज्येष्ठ नागरिकांचा नंबर आला. (naroshankarachi ghanta easy retreat of ration shopkeeper nashik news)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

File Photo
नारोशंकराची घंटा : एका टीक-मार्कमुळे गमावली संधी!

दुकानदाराने त्यांच्याकडील कार्ड घेतले आणि काहीसा तोऱ्यानेच म्हणाला, बाबा, तुम्हाला कितींदा सांगायचे तुम्ही रेशन आल्या आल्या नका येत जाऊ. दोन-चार दिवसांनी या. पहिल्यांदी इथल्या लोकांना धान्य दिले पाहिजे. तुमचं कार्ड परगावचं. त्यात तुम्ही लगेच येऊन सामान घेऊन जाता.

मग कमी पडला का इथली लोक ओरडता ना... नंतर दोन-चार दिवसानी या तुम्ही बाबा... असे बोलला. ज्येष्ठ नागरिक हजर जबाबीच होते. त्यांनी लागलीच उत्तर देत, परगावचे म्हणजे काय आम्हाला खायला लागत नाही का, की पाकिस्तानातला मी... तुमचं आज रेशन आलं त संध्याकायलोक संपत.

File Photo
नारोशंकराची घंटा : तुमच्‍या मित्रांना कॉल करून बोलवता का?

दोन-चार दिसांनी तुमच्या दुकानाला कुलूप पहायला येऊ का? साहेब एक काम करा, मला तुमच्या सायबाचा नंबर द्या लागलीच तुमच्या समोर फोन लावतो अन विचारतो, दोन दिसांनी मला रेशन भेटन का... भेटत आसन त मी दोन-चार कशाला आठ दिसांनी येतो मंग त झालं....!!!

ज्येष्ठ नागरिकाचा वाढलेला आवाज अन हजर जबाबीपणा पाहून रेशनदुकानदाराने सपशेल माघार घेत काही न बोलता हसल्यावारी घेत मुकाटपणे बाबाला रेशन दिले.

File Photo
नारोशंकराची घंटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()