आगामी महापालिका निवडणुका कधी होणार याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. मात्र या निवडणुकीसाठी अनेकांनी ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी भूमिका घेत स्वत:ची उमेदवारीही घोषित करून टाकली आहे. (naroshankarachi ghanta humor over chappal nashik news)
असाच तिकीट इच्छुकांचा मेळावा नुकताच शहरातील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यात काही माजी लोकप्रतिनिधींनीही हजेरी लावत आपण अद्यापही स्पर्धेत असल्याचे सूचित केले.
मंगल कार्यालयात मंदिर असल्याने सर्वांनीच आपले जोडे कार्यालयाबाहेर काढले होते. मेळावा संपल्यावर एका माजी नगरसेवकाने दुसऱ्याचीच चप्पल घातली. ही बाब ज्याची चप्पल होती, त्याच्या नजरेस पडल्यावर तो त्वरित संबंधिताकडे जात अतिशय आदराने ‘भाऊ तुम्ही चुकून माझी चप्पल घातल्या’चे निदर्शनास आणून दिले.
यामुळे कार्यकर्त्यांसह बैठकीला आलेल्या माजी लोकप्रतिनिधीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला, ही बाब लक्षात आल्यावर माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने ‘साहेबां’ची चप्पल शोधून दिली. त्यानंतर या सर्वांनी त्वरित बैठकीच्या ठिकाणावरून पाय काढता घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.