नारोशंकराची घंटा : साधू- संतांचं भाकीतही खरं ठरतं!

Vishwas Patil
Vishwas Patilesakal
Updated on

पानिपतकार ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांच्या पानिपत कादंबरीला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेक आवृत्ती आल्या व खपल्या. त्याची विश्वास पाटलांना रॉयल्टीही चांगली मिळाली.

.त्यातून त्यांनी कोल्हापूरमध्ये मोठे बंगल्याचे बांधकाम सुरु केले. त्या बंगल्याचे नावही ठेवलं पानिपत. हे बांधकाम सुरू असताना त्यांच्याकडे एक उंच पुरा दाढीवाला, भगवी वस्त्र परिधान केलेला साधू महाराज आला. (Naroshankarachi ghanta predictions of sadhus and saints also come true nashik news)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Vishwas Patil
नारोशंकराची घंटा : दारू, काहीही करू शकते!

साधू महाराजने विचारले, की ही कोणाची इमारत आहे. त्यावर विश्वास पाटील म्हणाले की ही माझीच इमारत आहे. मी बांधतो आहे असं म्हटल्यानंतर त्या साधूने विश्वास पाटलांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, की ही इमारत पूर्ण झाल्यानंतर या इमारतीत लाखो आणि करोडांचेच व्यवहार होतील.

इमारत पूर्ण झाली आणि खरोखरच त्या साधू महाराजाचं भाकीत खरं ठरत आहे. या इमारतीत लाखो आणि करोडोचेच व्यवहार होत आहेत असे पानिपतकार विश्वास पाटील यांनी सांगताच हास्याची लकेर उमटली.

शेवटी ते असे म्हणाले,‘ लाखो आणि करोड्यांची व्यवहार होत आहेत, याचे कारण तो बंगला मी एका बँकेला भाड्याने दिलेला आहे. त्यामुळे पैसे लोकांचे असले तरी ते या घरातच येत आहेत म्हणजे करोडोंचे व्यवहार होत आहे हे साधूंचे म्हणणे खरे ठरते आहे.

Vishwas Patil
नारोशंकराची घंटा : अन डेड बॉडी जेव्हा उठून बसते...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.