दादासाहेब गायकवाड सभागृहात ९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सुरू होते. संमेलनात आयोजित परिसंवादात एक साहित्यिक सांस्कृतिक दहशतवाद विषयावर मार्गदर्शन करत होते. सत्य बोललेले की कुणासही आवडत नाही. (NaroShankarachi Ghanta sakal special 9th All India Muslim Marathi Literary Conference comedy tragedy nashik news)
असे करणाऱ्यावर अघोषित बंदी घालण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्याचा आवाज बंद करून मुस्कटदाबी केली जाते. असे म्हणत असताना अचानक सभागृहाची लाइट गेली. मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्याचा आवाज दाबला गेला.
त्यावेळी लाइट जाताच प्रेक्षकांमधून आवाज आला, ‘असा होतो आवाज बंद’ आणि सर्व सभागृहात हास्य पिकला. त्यानंतर काही वेळात सभागृहाचे जनरेटर सुरू करण्यात आल्याने विद्युत पुरवठा सुरळीत झाला. वक्त्यांनीही पुन्हा आपले मार्गदर्शन पुढे सुरू केले. परंतु ती दोन मिनिटांची वेळ साहित्य संमेलनाच्या आठवणीत राहून गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.