नारोशंकराची घंटा

naroshankarachi  ghanta
naroshankarachi ghantaesakal
Updated on
politicians
politiciansesakal

कसं आहे, आज लय कार्यक्रम आहेत!

लोकप्रतिनिधींना जनसामान्‍यांमध्ये मिसळून राहावे लागते. सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावावी लागते. वाढदिवस सोहळा अन्‌ दहाव्‍याच्‍या कार्यक्रमाला शुभेच्‍छा अन्‌ सांत्‍वनांवर काम भागते.

पण जेव्‍हा वेळ व्‍यासपीठीय कार्यक्रमाची येते तेव्हा लोकप्रतिनिधी म्‍हणून अभ्यासपूर्ण भाषणाची प्रेक्षकांना अपेक्षा असते. पण एखाद्या लोकप्रतिनिधीला विषयाचे फारसे ज्ञान नसेल किंवा आवड नसेल तर काय गंमत होते, याची प्रचीती एका कार्यक्रमात आली.

सामाजिक उपक्रमाच्‍या जनजागृतीसाठी नाशिकला भरविलेल्‍या राज्‍यस्‍तरीय अधिवेशनाला शुभेच्‍छा देण्यासाठी आमदार आले अन्‌ सूत्रसंचालकाने त्‍यांना शुभेच्‍छा देण्यासाठी विनंती केली. मनोगत व्‍यक्‍त करायला उभे राहाताच, ज्‍या विषयावर अधिवेशन आहे, त्‍या सामाजिक विषयावर भाष्य करतील, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती.

पण आमदार महोदयांनी आपल्‍या मनोगतात चकार शब्‍द काढला नाही. ‘कसं आहे, आज भरपूर कार्यक्रम आहेत. तरी प्रत्‍येक कार्यक्रमाला मी हजेरी लावतोय. आज इथं आलो, खूप चांगले वाटलं,’ हेच वाक्‍य दर दोन वाक्‍यांनंतर बोलताना आमदारांनी दोन ते तीन मिनिटांत आपले मनोगत उरकले. सामाजिक विषयावर काहीच बोलले नसल्‍याची कुजबूज उपस्‍थित प्रेक्षकांमध्ये झाली. (naroshankarachi ghanta sakal special comedy tragedy nashik news)

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : सायबर कॅफे अन् कॉफी
politicians
politiciansesakal

नामसाधर्म्याचा जबरदस्त पगडा

काही व्यक्तींची नावे आपल्या इतकी परिचित झालेली असतात, की त्यांच्या टोपणनावाचा उल्लेख झाला तरी आपण त्या व्यक्तीला चटकन ओळखतो. विशेषतः राजकीय क्षेत्रातील व्यक्तींबाबत हे आपल्याला बघायला मिळते.

नेते सतत काही ना काही कार्यक्रमानिमित्त, कुठल्या तरी विषयावर बोलण्यासाठी म्हणा किंवा सभा, समारंभात आपल्याला दिसतात. त्यात ते बोलणारे नेते असले तर विचारायलाच नको. तर झालं असं, की एका शाहिराच्या पुस्तकाचा छोटेखानी प्रकाशन सोहळा झाला.

मान्यवर आणि प्रेक्षक दोघेही मोचकेच. त्यामुळे अर्धे सत्कारार्थी व अर्धे प्रेक्षक. त्यामुळे या छोट्याशा कार्यक्रमात बहुतांश लोकांना बोलण्याची संधी मिळाली. एक पदाधिकारी उठले आणि त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

आमचे मित्र शरदचंद्र आहेर यांनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. त्यांना अशीच सद्‍बुद्धी मिळो आणि कलावंतांचा आवाज बुलंद होत राहो, अशा सदिच्छा दिल्या. भाषण संपण्यावर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की हे शरदचंद्र नव्हे तर सुरेशचंद्र आहेत.

पण वेळ निघून गेल्यावर काय करणार? शेवटी जाता जाता त्यांनी ज्यांचे नाव सतत डोळ्यांसमोर येतात त्यांचाच उल्लेख चुकून झाल्याची कबुली दिली. परंतु आपली तुलना थेट शरदरावांशी झाली म्हटल्यावर सुरेशरावांची छाती ५६ इंच झाली, त्याचं काय?

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : ही पुढची सोय आहे..!
Onion
Onion esakal

भाव वाढतात तसे कमी नाही होत का?

एखाद्या वस्तूचे भाव वाढल्याचे जाहीर होताच क्षणाचाही विलंब न होता किरकोळ बाजारात त्या वस्तूचे भाव वाढल्याचे विक्रेते सांगतात. पण त्याच वस्तूचे भाव कमी झाले तर मात्र विक्रेते हा माल जुन्या दराने घेतला होता, भाव तोच असेल, अजून फक्त जाहीर झाले, प्रत्यक्षात उतरलेले नाहीत, असे सांगत गिऱ्हाइकांची बोळवण करतात.

मात्र अशा विक्रेत्याला चाणाक्ष महिला भेटली, की त्याला माघार घेणे भाग पडतेच. झाले असे, की सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत, तरीही किरकोळ विक्रेत्यांकडे मात्र कांदा वीस ते पंचवीस रुपये किलोनेच मिळत आहे.

सातपूर, अशोकनगरच्या एका चौकात भाजीवाला सायंकाळच्या वेळेत भाजीपाल्याची ओरडून विक्री करत होता. बऱ्यापैकी शिकलेली महिला भाजीपाला घेत होती. तिने कांद्यांचा दर काय आहे, हे विचारले तेव्हा तो पटकन ‘पंचवीस रुपये किलो’, असे उद्‍गारताच त्या महिने त्याला, ‘कांद्याचे दर मार्केटमध्ये सातशे ते आठशे रुपयांवर आले असताना, तुझ्याकडे कसा काय पंचवीस रुपये’, असे खडसावून विचारले तेव्हा, ‘ताई हा जुन्या दराने खरेदी केलेला माल आहे’, असे सांगू लागला.

त्या महिलने, ‘कारे, तू तर सांगतो दररोज पहाटे खरेदी करतो, मग हा कांदा काय गुदामात साठविला होता का महिन्यापासून? असा प्रश्‍न केला. त्याचे दहा बाय दहाचे घर आणि

हिस्टरी माहीत असलेल्या महिलेने वर्मावर बोट ठेवल्याने त्याची भंबेरी उडाली. मग काय, ‘ताई, भले तुम्ही पंधरा रुपयाने घ्या. तुमच्यासाठी सवलत देतो’, असे सांगत त्याने सुटका करून घेतली. भाजी घेणाऱ्या इतर महिलांनी मात्र, ‘असे लुटतात हे भाजीवाले. दर कमी होतात तेव्हा लगेच नाही कमी करत, वाढले की जागेवरच वाढतात, काय जमाना आहे बघा!’, असे सांगत तेथून काढता पाय घेतला.

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : भुजबळांच्या अनोख्या शुभेच्छा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.