नारोशंकराची घंटा

naroshankarachi  ghanta
naroshankarachi ghantaesakal
Updated on

ना शेकोटी, ना पुस्तक

शेकोटी लोककला साहित्य संमेलन भावबंधन मंगल कार्यालयात दोन दिवसांचं शेकोटी संमेलन संपन्न झालं. साधारणतः चार वाजता शेकोटी पेटवून या संमेलनाचे उद्‌घाटन झालं. मुळात ही शेकोटी होती की होळी हा प्रश्न उपस्थितांना पडला होता.

शेकोटी म्हणावी तर त्यात उभे केलेले ऊस, एरंड होते, त्यामध्ये श्रीफल म्हणजे नारळी टाकलेले होते. सभोवती रांगोलीही काढली होती. त्यामुळे हा प्रश्न पडणे सहाजिकच होत.

जसजसा अंधार वाढला तसतशी शेकोटीही क्षीण होत गेली आणि गारठा वाढू लागला, बऱ्याच जणांना वाटले की शेकोटी सम्मेलन आहे म्हणजे शेकोटीच्या कडेला बसूनच आपल्याला गरम गरम सगळे कार्यक्रम पाहायला मिळतील. (Naroshankarachi Ghanta sakal special nashik news)

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : आम्ही थांबावं का जावं...?

पण जसजशी रात्र वाढली तशी तशी थंडी वाढायला लागली शेकोटीची ऊब काही मिळेना. आणि मग मात्र लोकांनी काढता पाय घेतला. तिथं मोजकेच लोक उपस्थित राहिले आणि ज्या वेळेस गारटा खूपच वाढला.

त्यावेळेस बरेच लोक म्हणाले की आम्हाला वाटलं की हे बघा शेकोटी संमेलन आहे म्हणून इथे शेकोट्या असतील म्हणून आम्ही खरं रूप घेण्यासाठी आलो पण शेकोटेच नव्हत्या गारठलेले लोक साधारणतः बारा- साडेबारा वाजता निघून गेले आणि पुढचे कार्यक्रम मात्र रेंगाळले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुरस्कार वितरण आणि कलाकारांचा सत्कार असाही कार्यक्रम होता त्यासाठी बरेच साहित्यिकही उपस्थित झाले होते, त्यातल्या एका साहित्यिकांनी विचारलं अरे बापरे हे तर साहित्य संमेलन आहे, मग इथं कुठं बुक स्टॉल दिसत नाहीत म्हणून त्यांनी बरीच शोधाशोध केली पण त्याला काय बुक स्टॉल दिसले नाही.

कुठेतरी एका कोपऱ्यात मात्र एक जण तीन चार पुस्तके घेऊन विक्रीसाठी बसलेला होता. हे पाहून त्याची प्रचंड घोर निराशा झाली, त्याला लोककलेवरील कुठलेही पुस्तक मिळालेलं नाही.

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : अतिजलद म्हणजे नेमकं किती जलद...?

पुन्हा पुन्हा वाहतूक कोंडी..!

नाशिक शहरातील ‘ट्रॅफिक जाम’ सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. दिवसभरात एकदाही वाहतुकीची कोंडी होत नसेल, असा एकही मार्ग शहरात नाही. अर्थात्‌ याची कारणं प्रत्येक ठिकाणी वेगळी आहेत. कुठे रस्त्याची कामं सुरू आहेत, तर कुठे वाहतुकीला शिस्तच नाही. यात, काही ठिकाणी मुद्दाम वाहतूक विस्कळित करून कोंडी निर्माण करण्याचेही प्रसंग अनेकवेळा घडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

अशाच एका महत्त्वाच्या असलेल्या घारपुरे घाट परिसरात दोन दिवसांपूर्वी एका महिला लोकप्रतिनिधींची चारचाकी वाहतूक कोंडीत अडकली. वेळ अर्थात्‌च सायंकाळची होती. त्यामुळे कदाचित संबंधित लोकप्रतिनिधींना घाईदेखील असू शकते.

त्यामुळे त्यांनी तातडीने अंगरक्षक, सहाय्यक व थेट चालकालाही रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी पाच ते सात मिनिटांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत तर झाली; पण चालकच रस्त्यावर असल्याने त्यांना गाडी काही काढता आली नाही अन्‌ चालकाने पुन्हा गाडी सुरू करेपर्यंत रस्त्यावरची परिस्थिती पुन्हा जैसे थे..!

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : तुमच्‍या मित्रांना कॉल करून बोलवता का?

हम तुम्हारे है सनम

सध्या पक्ष पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना पक्ष बदलीचे वेध लागले आहे. अनेक जण या गटातून त्या गटात जातानाचे वृत्त ऐकाव्यास मिळत आहे. याबाबत काहीजण चर्चा करत असताना अचानक त्यातील एकाने सांगितले जाऊ दे यार राजकारणाचे काही खरे नाही.

पक्ष बदलीने एखादा पदाधिकारी आज त्यांच्या नेत्यास हम साथ साथ है असे म्हणत असतो. तोच पदाधिकारी दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्याची भेट घेऊन हम तुम्हारे है सनम असे म्हणत गळाभेट घेत आहे.

त्यामुळे राजकारणी गप्पा सोडा आणि कामाला लागा असे म्हणत त्याने सर्वांना सध्याच्या परिस्थितीची ओळख करून दिली. त्यामुळे इतरांना आता काय बोलावे, समजे नासे झाल्याने सर्वांनी आपापल्या कामाची वाट धरली.

naroshankarachi  ghanta
नारोशंकराची घंटा : एका टीक-मार्कमुळे गमावली संधी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()