वेळेवर पोहोचण्याबाबत राजकीय नेते फार बदनाम आहेत. दिलेली वेळ न पाळण्याची त्यांची ख्याती तर जगजाहीर आहे. याला अपवाद काही नेते ही आहेत. पण आता नवीन नेत्यांचा नवा ट्रेंडही बघायला मिळतो.
तो म्हणजे, दिलेला शब्द कुठल्याही वेळेला पाळायचा. म्हणजे कितीही वेळ झाली तरी कार्यक्रमाला हजेरी लावायची. दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून ज्यांची ख्याती पसरली आहे, अशा ‘तांब्यां’ चा नाशिकमध्ये ‘सोन्या’ सारखा कार्यक्रम नुकताच पार पडला. (Naroshankarachi ghanta sakal special nashik news)
कार्यक्रमाची वेळ होती सायंकाळी ५ वाजेची. थेट नगर जिल्ह्यातून नाशिकपर्यंत पोहोचायचे म्हणजे दोन ते तीन तासांचा प्रवास. पण या नेत्याने थेट राजधानी एक्स्प्रेस पकडली. सायंकाळी सातवाजेपर्यंत आपण कार्यक्रमस्थळी पोहोचणारच, असा त्यांचा कयास होता.
परंतु, ज्या गाडीच्या भरवशावर हा अंदाज बांधला होता, तोच खोटा ठरला. गाडी एक तास उशिरा धावली. इकडे आयोजकांसह स्पर्धकांचाही जीव टांगणीला लागला. प्रमुख अतिथी केव्हा येणार म्हणून अर्धे स्पर्धक तर निकाल ऐकण्यापूर्वीच गायब झाले.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
आता राहिले साहिले स्पर्धेक निघून नको जायला म्हणून त्यांच्यासमोर उपस्थित सर्वांनी कविता सादर केली. विनोद सांगितले. वेळोवेळी उदघोषणाही केली. पण प्रमुख अतिथींचे ‘लोकेशन’ मिळेना.
रात्रीचे आठ वाजले आणि प्रमुख अतिथी ‘रिचेबल’ झाले. त्यांचे थोड्याच वेळात आगमन होणार असल्याची घोषणा झाली आणि उपस्थित प्रेक्षकांसह स्पर्धकांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले. कार्यक्रम पार पडला खरा पण, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता,
त्यातील बोटावर मोजण्याइतकेच लोक शिल्लक होते. पण आयोजकांनी ही संधी साधत, आमच्या संस्थेकडेही लक्ष असू द्या, असे सांगत प्रमुख अतिथींकडून शब्द सोडवून घेतला नसेल तरच नवल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.