स्थळ : नवीन नाशिक, वेळ : कामावरुन घरी जाण्याची
शहरातील नागरिकांची प्रवास व्यवस्था सुखकर व्हावी यासाठी नाशिक मनपा प्रशासनाने अद्ययावत सुविधासंपन्न अशी सिटीलिंक बससेवा सुरु केली. ही बससेवा दररोज शहरातील लाखो नागरिकांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोचवत असते. (naroshankarachi ghanta traffic tragedy nmc citylinc city bus nashik news)
हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
आणि जेथे या प्रवाशांना उतरायचे आहेत तेथे थांबे आणि बस उभी राहण्यासाठी आरक्षित अशी पिवळ्या रंगाची आखणी देखील केली आहे. जेणे करुन वाहतूक कोंडी होणार नाही. मात्र या फोटोतील गाडीने पिवळ्या रंगांच्या डब्यात स्वतःच जागा अडवल्याने प्रवाशांना उतरविण्यासाठी बसला भर रस्त्यात थांबावे लागले.
बर त्यामुळे थांब्यावर उभ्या प्रवाशांना रस्त्यावर येत बस गाठावी लागली अन् मागे उभ्या गाड्या ताटकळल्या आणि मोठमोठ्याने हॉर्नचे भोंगे वाजू लागले. तेव्हा बसमध्ये चढणाऱ्या एका आजीबाईंच्या तोंडून आपसूक बाहेर आले, ‘बाई ही जागा या गाडीची नाहीये, कोणी लावलीये काय माहीत...?’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.