येवला : राष्ट्रीय लोकअदालतीत ९०५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. न्यायालयात दाखल असलेल्या सर्व प्रकरणांत तडजोडीअंती सुमारे १ कोटी २६ लाख ७६ हजार ६८८ रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आले. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत झाली. तीत दाखल प्रकरणांपैकी बँका, पतसंस्थांचे २ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून ६१ लाख ८५ हजार १८३ रुपयांची वसुली झाली. (Nashik national lok adalat at yeola marathi news)
४९ फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ४४ हजार ५०० रुपये वसूल झाले. सात लवाद प्रकरणांतून १८ हजार ४२५ रुपयांचे शल्क वसूल झाले. कौटुंबिक वाद व खावटीची तीन प्रकरणे, तर दिवाणी १८ प्रकरणे निकाली निघाली.
व्हीसीद्वारे पक्षकारांशी संवाद साधून एक दिवाणी, असे एकूण १०० दाखल प्रकरणे निकाली निघाली. दाखलपूर्व बँका, पतसंथांची आठ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून १२ लाखांची वसुली झाली. पाणपट्टी व घरपट्टीची ७९७ प्रकरणे निकाली काढून १२ लाख ७९ हजार ४४३ रुपये वसूल झाले. (Latest Marathi News)
दोन पॅनलची नेमणूक केली होती. पॅनल एकचे काम येथील दिवाणी न्यायाधीश एम. एस. लिगाडे यांनी, तर पॅनल सदस्य म्हणून ॲड. आर. एल. गोतीस यांनी काम बघितले. पॅनल दोनचे काम सहदिवाणी न्यायाधीश ए. एस. कांबळे, तर पॅनल सदस्य म्हणून ॲड डी. बी. बहादुरे यांनी काम पाहिले. येवला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. टी. कदम, उपाध्यक्ष ॲड. आर. एस. तिवारी, सेक्रेटरी ॲड. के. बी. देशमुख, ॲड. एस. आहेर, ॲड. एस. एस. शेख, ॲड. एम. एम. शेख, ॲड. आर. डब्ल्यू. गायकवाड, ॲड. वाय. डी. पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.