Nashik Monsoon News : जिल्ह्यात ‘वळिवा’चा 1 हजार 489 घरांना तडाखा; 72 लाखांच्या मदतीची गरज

Nashik Nashik : वळिवाच्या पावसाने जिल्ह्यातील सहा व्यक्तींसह शेकडो पशुधनाचा बळी घेतला असताना एक हजार ५०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
1 thousand 489 houses were hit by Extreme Rain in district (file photo)
1 thousand 489 houses were hit by Extreme Rain in district (file photo)esakal
Updated on

Nashik Nashik : वळिवाच्या पावसाने जिल्ह्यातील सहा व्यक्तींसह शेकडो पशुधनाचा बळी घेतला असताना एक हजार ५०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात एप्रिल व मेमध्ये झालेल्या वळिवाच्या पावसामुळे जिल्ह्यातील एक हजार ४८९ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले. त्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ७२ लाखांचा प्रस्ताव राज्य शासनाला सुपूर्द केला. (1 thousand 489 houses were hit by Extreme Rain in district)

त्यापैकी २० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या आधारे मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत केली जाते. उपचारांसाठी पाच हजारांपासून ते अडीच लाखांपर्यंतचे अर्थसहाय सरकार करते. वळिवाच्या पावसामुळे जिल्ह्यातील एक हजार ५६३ घरांची पडझड झाली.

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या किंवा नुकसान झालेल्या व्यक्तींना नैसर्गिक आपत्ती निकषाच्या आधारे आर्थिक मदत केली जाते. मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. याव्यतिरिक्त गाय, मेंढी, शेळी, बैल, वासरू या पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

रस्ते, शाळा, अंगणवाडी, कम्युनिटी हॉल यांसारख्या सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळतो. प्रमुख जिल्हा मार्गाचे नुकसान झाल्यास एक लाख ते सव्वा लाखापर्यंत मदत होते. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ६० ते ७५ हजारांपर्यंत निधी मिळू शकतो. पिण्याच्या पाण्याची योजना दुरुस्तीसाठी दोन लाखांपर्यंत मदत मिळते. (latest marathi news)

1 thousand 489 houses were hit by Extreme Rain in district (file photo)
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक शहरात 10 केंद्रे

शाळा दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये, तर पंचायत घर, अंगणवाडी, कम्युनिटी हॉलसाठी अडीच लाख रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. पक्क्या घराचे नुकसान झाल्यास एक लाख २० हजारांची मदत राज्य शासनाकडून मिळते. कच्च्या घरांचे पूर्णत: नुकसान झालेले असल्यास एक लाख ३० हजार रुपयांपर्यंत मदत राज्य शासन करते.

जिल्ह्यात एक हजार ४१० कच्च्या घरांचे, तर ६९ पक्क्या घरांचे अंशत: (१५ टक्के) नुकसान झाले. सुरगाण्यातील पाच, चांदवड दोन व देवळ्यातील तीन घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने १२ लाख ५० हजारांची मागणी केली आहे. त्यापैकी २० लाख रुपये प्राप्त झाले असून, अनुदान वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

पूर्णत: नुकसान झालेली घरे

सुरगाणा : ५ घरे- ६ लाख ५० हजार रु.

चांदवड : २ घरे- दोन लाख ४० हजार रु.

देवळा : ३ घरे- तीन लाख ६० हजार रु.

एकूण : १२ लाख ५० हजार रुपये

1 thousand 489 houses were hit by Extreme Rain in district (file photo)
Nashik News : धरणसाठा 79 कोटी 10 लाख लिटरने ‘समृद्ध’

अंशत: नुकसान झालेली घरे

तालुका..........कच्ची घरे.....पक्की घरे

नाशिक............२६.............३

पेठ....................२६४...........०

त्र्यंबकेश्‍वर.......२४९...........०

निफाड..............१७...........०

येवला................०.............१७

सिन्नर..............६८...........०

चांदवड.............५..............१५

नांदगाव............११............०

सुरगाणा............४५५.........१२

कळवण..............००............१०

बागलण............१५...............०

देवळा................०...............१२

एकूण..............१,४१०..........६९

1 thousand 489 houses were hit by Extreme Rain in district (file photo)
Raj Thackeray Nashik Daura : राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.