Nashik Crop Insurance : शेतकऱ्यांचा पिक विम्याचा हिस्सा शासन भरत असल्याने आता एक रुपयात पीक विमा काढला जात आहे. तरीही खरिपातील पिकांना विम्याचे कवच घेण्याकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केला आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे आठ लाख हेक्टरवर खरिपाची पिके घेतली आहे. मात्र अवघ्या ३ लाख ९४ हजार हेक्टरवरील पिकांनाच विम्याचे कवच घेतले आहे. पिकांना सुमारे १८२७ कोटी रुपयांची विमा संरक्षण मिळणार आहे. ( 1 thousand 827 crore protection in district of crop insurance)