Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक शहरात 10 केंद्रे

Nashik News : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होत असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
Nashik Teacher Constituency Election
Nashik Teacher Constituency Election esakal
Updated on

Nashik News : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होत असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात एकूण २९ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी दहा मतदान केंद्रे शहरात असून, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकराला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (10 Centers in Nashik City for Teachers Constituency)

नाशिक जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघाच्या २५ हजार ३०२ मतदानाच्या अनुषंगाने जिल्हाभरात २९ केंद्रांद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात प्रामुख्याने देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, सिन्नर येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र, बागलाण, येवला, निफाडसाठी प्रत्येकी दोन मतदान केंद्रे.

मालेगाव शहर एक व ग्रामीण दोन अशी तीन मतदार केंद्रे, तर नाशिक शहर व परिसरासाठी दहा मतदान केंद्रे अशा एकूण २९ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. या मतदान केंद्राच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रासाठी सहा कर्मचारी नियुक्त केले जातील. (latest marathi news)

Nashik Teacher Constituency Election
Nashik NMC : पंचवटीत धोकादायक वाडे, घरमालकांना नोटिसा!

त्यात एक केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षक, एक शिपाई असे सहा कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहेत. त्यासाठी १७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच बंदोबस्तासाठी फ्लाइंग स्कॉड राहणार आहे.

त्यात दोन पोलिस कर्मचारी, व्हिडिओ पाहणी पथक-१, भरारी पथक-१, व्हिडिओ निरीक्षक-१ असे पाच जणांचे पथक राहील. जिल्हा प्रशासन या नियोजनावर अखेरचा हात फिरवताना व्यस्त दिसून येत आहे.

Nashik Teacher Constituency Election
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेला शासनाकडून ‘आर्थिक टेकू’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.