इंदिरानगर : चार दिवसात इंदिरानगर-वडाळा परिसरात तीन वेळा आठ ते दहा तासांपेक्षा बत्ती गुल झाल्याने वीज कंपनीविरोधात नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वीजेच्या संदर्भात विचारपूस करण्यासाठी कार्यालयात फोन केला असता वीज कंपनीतर्फे कुणी फोन देखील उचलत नाही अशा तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या. (10 hours power cut 3 times in a week in Indiranagar area)
गुरुवारी (ता.१६) सकाळी साडेअकराला वाजता विनयनगर, दीपालीनगर, शिवाजीवाडी, खोडेनगर, विधातेनगर, विठ्ठल मंदिर आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला. एका ठिकाणी नादुरुस्त झालेली केबल दुरुस्त करण्याचे काम सुरू होते.
सोबत पावसाळापूर्व काम म्हणून झाडांच्या फांद्या छाटणीचे काम सुरू असल्याने विद्युत पुरवठा खंडित केल्याची सूचना देण्यात आली होती. मात्र रात्री नऊपर्यंत देखील वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने दिवसभराच्या उकाड्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. (latest marathi news)
सायंकाळनंतर वारंवार फोन केल्यानंतर रात्री साडेअकरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल असे वीज कंपनीतर्फे सांगण्यात आल्याने नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडली. या पूर्वीदेखील रात्री बारापासून ते सकाळी पाचपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकजण उकाड्याने हैराण झाले.
वडाळा येथील सर्वे क्रमांक ८२ मधील सबस्टेशन जागेसाठी वीज कंपनीने सुरू केलेले प्रयत्न तातडीने वरिष्ठ पातळीवरून मार्गी लावून या ठिकाणी त्याची निर्मिती करून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची जोरदार मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.