Nashik News : येवला आगाराला आषाढी एकादशी पावली; पंढरपूर वारकरी वाहातूकीतून 10 लाखाचा महसूल

Nashik : विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरी आषाढी एकादशी वारकऱ्यांची रिघ लागते. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर भक्त पंढरपूरला दर्शनासाठी गेल्याने यंदाची आषाढी येवला आगाराला पावली.
revenue
revenuesakal
Updated on

Nashik News : विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरी आषाढी एकादशी वारकऱ्यांची रिघ लागते. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर भक्त पंढरपूरला दर्शनासाठी गेल्याने यंदाची आषाढी येवला आगाराला पावली. विविध सवलतीसह ७० फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल १० लाख १३ हजार रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारप्रमुख प्रवीण हिरे यांनी दिली. दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी येवला आगारातर्फे गाव ते पंढरपूर अशी सेवा उपलब्ध होती. (10 lakhs revenue from Pandharpur Warkari on Ashadhi Ekadashi to yeola Agar)

आषाढी यात्रेसाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करून पंढरपूर जाण्यासाठी ४४ यात्रेकरू इच्छुक असल्यास थेट गावातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्वत्र पोहोचविण्यात आली होती. एसटी प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. धुळगाव, मुरमी, पिंपळगाव लेप येथून तसेच येवला बसस्थानकातून बसेस सोडण्यात आल्या.आषाढी यात्रा सप्तमी ते त्रयोदशी या कालावधीत एकूण २८ बसेसच्या माध्यमातून ७० फेऱ्या करून १७ हजार २७८ किमीचे अंतर पार बसने केले. (latest marathi news)

revenue
Nashik News : माजी आमदार अपूर्व हिरेंच्या बॅनर्सचा विरोधकांना धसका; वाढदिवसानिमित्त चौकाचौकात शुभेच्छा फलक

दरम्यान सवलत मुल्यासह १० लाख १३ हजार ७२५ इतके उत्पन्न आगाराला मिळाले आहे. प्रौढ -१४०३, लहान मुले -६४,महिला १५६२, अमृत ज्येष्ठ नागरिक १८४४, ज्येष्ठ नागरीक ३७५ अशा एकुण ५ हजार २४८ भाविकांची वाहतूक आगाराच्या बसमध्ये करण्यात आली. गतवर्षांपेक्षा यावर्षी यात्रेकरूसह एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. येवला आगाराने स्पेशल जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांनी लालपरीवर विश्वास दाखवत जादा गाड्यांचा लाभ घेत यात्रा पूर्ण केली.

''पंढरपूर दर्शनासाठी बस पाठवण्याचे नियोजन केले होते. येवला आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचा एकसंघपणा एकत्रित नियोजन व वारकऱ्यांच्या सहकार्यामुळे मोठया प्रमाणावर या सेवेला यश मिळाले.प्रवाशांचा एसटीचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी आगार कायम तत्पर आहे.''-प्रवीण हिरे,आगारप्रमुख,येवला

revenue
Nashik News : राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये ‘अंनिस’चा स्वतंत्र कक्ष! ‘अंनिस’कडून स्वागत; 'महाराष्ट्र पोलीस’चे पाऊल पथदर्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.