Nashik News : स्मार्ट सिटी कंपनी व नाशिक महापालिकेतर्फे गंगापूर रोडवर तब्बल दहा सिग्नल प्रस्तावित करण्यात आले. मात्र या सिग्नलमुळे वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी अधिक वाढणार असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केल्यानंतर आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांची भेट घेऊन केबीटी सर्कल व्यतिरिक्त अन्य चौकात प्रस्तावित करण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणा बसू नये व ते प्रस्ताव कायमचे रद्द करावे अशा सूचना दिल्या. (10 signals on Gangapur Road)
शहरातील विविध २२ ठिकाणी सिग्नल बसविण्याच्या सूचना पोलिसांच्या वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने स्मार्ट सिटी योजना अंतर्गत याबाबत कार्यवाही करण्यात येत होती. शहरात बसविणाऱ्या २२ सिग्नल पैकी तब्बल १० सिग्नल हे गंगापूर रोड येथे बसवण्यात येणार होते. गंगापूर रोडवरील सप्तरंग चौक, विद्या विकास सर्कल, एबीटी सर्कल, हुतात्मा सर्कल, भोसला टी पॉइंट, मॅरेथॉन सर्कल, प्रसाद सर्कल.
दत्तू चौक सर्कल, डी के नगर, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल या दहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार होती. परंतु, गंगापूर रोड येथे बसवण्यात १० सिग्नलमुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतूक थांबा निर्माण होणार होता. तसेच गंगापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांच्या वेळेचे नुकसान होणार होते. (latest marathi news)
आमदारांनी व्यक्त केली नाराजी
अशा प्रकाराने नवीन दहा सिग्नल बसवण्याचे काम करण्यापूर्वी स्मार्ट सिटी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीशी किंवा नागरिकांची चर्चा केलेली नाही. अशा प्रकारांनी सुरू असलेल्या कारभाराबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त करताना सदरची कामे तत्काळ रद्द करण्याची मागणी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली. तसेच मंजूर काम एका ठिकाणी व काम दुसऱ्या ठिकाणी सुरू आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना अशा प्रकाराने परस्पर काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. नागरिकांची मागणी असणाऱ्या केबीटी सर्कल खेरीज गंगापूर रोड परिसरातील इतर सर्व प्रस्तावित सिग्नल यंत्रणा रद्द करण्याच्या सूचना केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.