मालेगाव : येथील फळफळावळ बाजारात गेल्या महिन्यापासून सफरचंदाची आवक वाढली आहे. नवरात्रोत्सवापासून दिवसागणिक सफरचंद विक्रीत वाढ होत आहे. शहर व परिसरात रोज किमान दहा टन सफरचंद विकले जात आहेत. काश्मीरमध्ये यावर्षी सफरचंदाचे विक्रमी उत्पादन झाल्याने सर्वत्र सफरचंदांची रेलचेल असून भाव सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. डिलक्सन जातीचे सफरचंद बाजारात प्रामुख्याने विक्रीस येत आहेत. (10 tons of apples are being sold in Malegaon every day )