Nashik News : नाशिकमधून 100 किलो फुले दिल्लीच्या बाजारपेठेत

Nashik News : दिल्लीच्या बाजारपेठेमध्ये नाशिकच्या फुलांना प्रचंड मागणी असल्याने त्याअनुषंगाने इंडिगो कंपनीतर्फे प्रवासी वाहतुकीबरोबरच आता मालवाहतूकदेखील सुरू करण्यात आली आहे.
Commencement of freight by Indigo Company
Commencement of freight by Indigo Companyesakal
Updated on

Nashik News : दिल्लीच्या बाजारपेठेमध्ये नाशिकच्या फुलांना प्रचंड मागणी असल्याने त्याअनुषंगाने इंडिगो कंपनीतर्फे प्रवासी वाहतुकीबरोबरच आता मालवाहतूकदेखील सुरू करण्यात आली आहे. मालवाहतुकीत पहिल्याच दिवशी शंभर किलो फुले नाशिकच्या शेतातून दिल्लीच्या बाजारपेठेत पोचली. (100 kg flowers from Nashik to Delhi market)

इंडिगो एअर सर्विसेसतर्फे नाशिकमधून दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात इंडिगोच्या विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये सहा उड्डाणे नाशिकच्या ओझर विमानतळावरून होतात. या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विमानाची प्रवासी क्षमता १८० सीट आहे.

प्रवासी वाहतुकीबरोबरच इंडिगो कंपनीला कार्गो सेवादेखील सुरू करण्यास एअरपोर्ट अॅथोरिटीने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने मंगळवार (ता.२१) पासून वाइन कॅपिटल म्हणून देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून मालवाहतूकदेखील सुरू करण्यात आली आहे. नाशिकच्या फुलांना दिल्लीच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दिल्लीहून दुबईच्या बाजारपेठेत नाशिकची फुले पोचतात. (latest marathi news)

Commencement of freight by Indigo Company
Nashik NMC News : स्ट्राँगरूमच्या स्वच्छतेसाठी 44 कर्मचाऱ्यांचे विशेष पथक

त्याअनुषंगाने पहिल्या दिवशी शंभर किलो फुले दिल्लीच्या बाजारपेठेत पाठवण्यात आली. कार्गो विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी एअरपोर्ट मॅनेजर आशिष अब्राहम, कार्गो क्लस्टर हेड अनुप कुमार नायर, निमाचे सहसचिव व एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल, कार्गो नाशिकचे पदाधिकारी महेंद्र पगार, पंकज कासलीवाल, अजय चंद्रा, व्यवस्थापक नितीन वर्मा आदी उपस्थित होते.

"प्रवासी वाहतुकीबरोबरच आता मालवाहतूकदेखील नाशिक दिल्ली विमानसेवेत केली जाणार आहे. नाशिकच्या विकासासाठी ही बाब महत्त्वाची आहे." - मनीष रावल, अध्यक्ष एव्हिएशन कमिटी, आयमा.

Commencement of freight by Indigo Company
Nashik Police Election Duty : पोलिसांवरील ताण झाला हलका! लोकसभा निवडणुकीच्या सततच्या बंदोबस्तामुळे होता तणाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.