Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 103 योजनांना मिळेना वीजजोडणी; वीजबिल थकल्याने पाणीपुरवठा ठप्प

Jal Jeevan Mission : जिल्ह्यात टंचाईची दहाकता लक्षात घेऊन जलजीवन मिशनअतंर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्याचे आदेश आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal
Updated on

Jal Jeevan Mission : जिल्ह्यात टंचाईची दहाकता लक्षात घेऊन जलजीवन मिशनअतंर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्याचे आदेश आहे. या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६१३ योजना पूर्ण केल्या. मात्र, वीजबिल न भरल्यामुळे जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण होऊनही जिल्ह्यातील ११० योजना सुरू नसल्याचे समोर आले आहे. (nashik 103 schemes of Jal Jeevan do not get electricity connection marathi news)

यातही, प्रत्यक्षात १०३ ठिकाणी वीजजोडणीच नसल्याने पाणीपुरवठा करता येत नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात एक हजार २२२ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्यापैकी ३१ मार्चपर्यंत जवळपास ६१३ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली आहेत. मात्र, प्रत्यक्षात या योजना पूर्ण होऊनही केवळ ५०३ ठिकाणीच नागरिकांना पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

उर्वरित ११० ठिकाणी वीजजोडण्या नसल्यामुळे उद्भव विहिरींना पाणी असूनही नागरिकांना त्याचा पुरवठा करता येत नसल्याचे चित्र आहे. ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून त्यांचे थकीत वीजबिल भरण्यास परवानगी दिली. मात्र, या ग्रामपंचायतींनी आधीच या निधीतून विकास आराखडे तयार केले असल्यामुळे निधी खर्चात बदल करायचा असल्यास त्या आराखड्यातील काम बदल करणे गरजेचे आहे. (latest marathi news)

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : जलजीवनच्या कामांना मुदतवाढ देण्याच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण

विकास आराखड्यातील बदल करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. त्यामुळे आराखड्यातील कामबदलाचे प्रस्ताव तयार करणे, त्याला ग्रामसभेची, पंचायत समितीची मंजुरी घेऊन तो प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवणे या कामामध्ये बराच वेळ जात असल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींच्या आराखड्यातील कामांचे बदल होऊ शकलेले नाहीत. जानेवारीनंतर जिल्हा परिषदेला जवळपास ६१ कोटी रुपयांचा बंधित निधी आलेला आहे.

यामुळे या निधीतून थकीत वीजबिल भरणा करता येणे शक्य आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायती थकीत वीजबिल भरण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील ६१३ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण होऊनही केवळ ५०३ योजनांद्वारे संबंधित गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत असून, उर्वरित ११० गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांना वीजजोडणी नसल्यामुळे तेथे पाणीपुरवठा होऊ शकत नाही.

''जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या एक हजार २२२ योजनांपैकी ६१३ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. या योजनांपैकी ५०३ योजनांमधून पाणीपुरवठाही सुरू झाला आहे. उर्वरित ११० योजनांना अद्याप वीजजोडणी मिळाली नसल्याने योजना सुरू झालेल्या नाहीत. याबाबत सर्व संबंधितांची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल. सर्व योजनांमधून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जाईल.''- संदीप सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : कामे झाली 1410 कोटींची, देयके निघाली 571 कोटींची; जलजीवन मिशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.