नाशिक : द्वारका परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर वसलेल्या १०९ दुकानदारांना निष्काषित करण्याचे उपायुक्तांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविले आहेत. यासोबतच यापूर्वी जिल्हा न्यायालयाने दिलेला निकालदेखील रद्दबादल ठरविला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात महापालिका सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे. द्वारका चौक परिसरातील सर्वे क्रमांक ४८९ मधील मिळकत क्रमांक २८२ हे चार एकर क्षेत्र महापालिकेच्या मालिकेचे आहे. (109 relief to shopkeepers High Court judgment on municipal land on Dwarka )