Nashik News : ॲलन करिअर इन्स्टिट्यूट नाशिक अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये तसेच बोर्ड क्लासेसमध्ये आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी ICSE बोर्ड परीक्षेच्या निकालात ॲलन नाशिकच्या विद्यार्थ्यांनी शहरात अव्वल स्थान पटकावले आहे. (10th ICSE Result Declared)
ॲलन नाशिकचे केंद्रप्रमुख शशी शंकर सिंग यांनी सांगितले की, आयसीएसईच्या निकालात ॲलन नाशिकची विभा सोनवणे ९९.२० टक्के गुणांसह अव्वल आली आहे.
नाशिकमध्ये ॲलनच विद्यार्थी ओजस उपासनी ९९.०० टक्के गुणांसह द्वितीय, चिन्मय पाटील ९८.८० टक्के गुणांसह तृतीय, स्मृती झिकरे आणि तनिष्का भामरे ९८.६० टक्के गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. (latest marathi news)
यासोबतच निकालात ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. यापैकी 15 जणांनी 96 टक्क्यांहून अधिक तर 6 जणांनी 98 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
30 विद्यार्थ्यांनी अनेक विषयात 100 टक्के गुण मिळवले. ॲलन नाशिक शाखेचे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा केंद्रात गौरव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.