Nashik Crime News : म्हसरूळ शिवारात 110 कोटींचा टीडीआर घोटाळ्याचा आरोप; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

Nashik News : म्हसरूळ शिवारातील बोरगड स्टेशनच्या बाजूला असलेल्या जागेवर ॲग्रिकल्चर झोन असतानादेखील निवासी क्षेत्रातील दर देऊन टीडीआर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik News : म्हसरूळ शिवारातील बोरगड स्टेशनच्या बाजूला असलेल्या जागेवर ॲग्रिकल्चर झोन असतानादेखील निवासी क्षेत्रातील दर देऊन टीडीआर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ॲग्रिकल्चर झोनमधील दर ३० कोटी असताना निवासी झोनमधील जवळपास सहा हजार रुपये प्रतिचौरस मीटर दराने ११० कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा दावा करून याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. (110 Crore TDR Scam Allegations in Mhasrul Shivar)

सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देवेंद्र उपाध्याय व अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. म्हसरूळ येथे बोरगड स्टेशन येथील सर्वे क्रमांक २५०, २५२, २५३ मध्ये २०१७ च्या विकास आराखड्यात ॲग्रिकल्चरल झोन जाहीर करण्यात आला.

ॲग्रिकल्चरल झोनमध्ये विकास कामे करता येत नाही. त्यापूर्वी शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी २००८ ते २०१७ या कालावधीमध्ये जमीन खरेदी केली. जमीन खरेदी करताना महापालिकेच्या नगररचना विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडील मूल्यांकन तक्त्यानुसार दर निश्चित न करता महापालिकेच्या नगररचना विभागाने सरकारी दर निश्चित करून त्यानुसार ११० कोटी रुपयांचा टीडीआर दिला.

ॲग्रिकल्चर झोन असताना निवासी भागाचा टीडीआर दिल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाने घोटाळा केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ॲग्रिकल्चरल झोनमधील दर १३८० रुपये प्रतिचौरस मीटर तर निवासी क्षेत्रातील दर सहा हजार नऊशे प्रतिचौरस मीटर असा नोंदविण्यात आला आहे. यातून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. नाशिकसह मुंबईतील १६ बांधकाम व्यावसायिकांचा संबंध आहे. (latest marathi news)

Nashik Crime News
Beed Crime News : 'फॉरेक्स ट्रेडिंग'च्या नावाखाली माजी मंत्र्याच्या भावाला फसवलं; बीड पोलिसांनी 'असा' लावला छडा...

देवळाली घोटाळ्यावर पांघरून?

देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१ या जागेवर शाळा, खेळाचे मैदानासाठी आरक्षण होते. जागा मोफत देण्याचे मूळ मालकांनी लेखी दिले असताना महापालिकेकडे ‘टीडीआर’ची मागणी केली. एकूण १५, ६३० चौरसमीटर क्षेत्राचा ‘टीडीआर’ महापालिकेकडून घेताना सिन्नर फाटा येथे असलेली जागा नाशिक रोडच्या बिटको चौक ते पोलिस ठाण्याच्या बाजूने उड्डाणपुलापर्यंत दर्शविली.

त्यामुळे मूळ जागेचा सरकारी भाव ६,८०० रुपये प्रतिचौरस मीटर असताना मोक्याची जागा दर्शवून २५,१०० प्रतिचौरस मीटर भावाने ‘टीडीआर’ घेतला. यातून महापालिकेला शंभर कोटींपेक्षा अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. जानेवारी २०२२ मध्ये शासनाला अहवाल सादर करण्यात आला, मात्र अद्यापही शासनाकडून अहवालातील माहिती जाहीर करण्यात आली नाही.

Nashik Crime News
Pune Crime : पेट्रोल ओतणाऱ्याला कोठडी; महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.