NMC News : ‘पीओपी’च्या 110 मूर्ती जप्त; महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून मूर्तिकारांना नोटिसा

NMC : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
nmc
nmcesakal
Updated on

NMC News : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जात असल्याची माहिती महापालिकेकडे प्राप्त झाल्याने मूर्ती तयार करून व त्याचा साठा करणाऱ्या मूर्तिकारांवर महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कारवाई करण्यात आली असून, नोटीस बजावण्यात आल्या आहेत. (110 idols of POP seized notice to sculpture from Environment Department of Municipal Corporation )

राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गणेशोत्सवासह इतर सण, उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने शहरातील मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्माण न करण्याच्या सूचना आहेत. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने वेळोवेळी मूर्तिकारांना व मूर्ती निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. मात्र काही मूर्तिकार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करीत असून छुप्या पद्धतीने साठा करून ठेवत असल्याची माहिती पर्यावरण विभागाला मिळाली. साठा केलेल्या मूर्ती जप्त करण्याची कारवाई मनपाच्या पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत केली जात आहे. (latest marathi news)

nmc
Nashik NMC News : महापालिका घराघरांतून शोधणार प्लॅस्टिक! शासनाच्या कानपिचक्या

सातपूर पर्यावरण विभागाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा साठा असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर ११० मूर्ती जप्त करण्याची कारवाई केली. सातपूर विभागात वनविहार कॉलनी येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा साठा आढळून आला. पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांच्या आदेशानुसार सातपूर विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ११० मूर्ती जप्त केल्या. मूर्तिकारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या मोहिमेत सुरेंद्र लाहोरी, घना मुडा, विजय सपकाळ सहभागी झाले होते.

nmc
NMC News : तळघरातील बेकायदा व्यवसायाबाबत कानावर हात; सर्वेक्षण कागदावरच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.