Nashik News : समाजातील दातृत्वाला आहोटी; पंचवटी स्मशानभूमीतील दानपेटीत वर्षभरात अवघे 1100 रुपये

Nashik : राज्यात मोजक्या ठिकाणी मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते, त्यात नाशिक महापालिकेचाही समावेश आहे.
Donation box in the cemetery.
Donation box in the cemetery.esakal
Updated on

Nashik News : राज्यात मोजक्या ठिकाणी मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते, त्यात नाशिक महापालिकेचाही समावेश आहे. हे काम जनतेच्या कराच्या पैशातून होते, याला समाजाचा हातभार लागणे अपेक्षित आहे. परंतु, पंचवटी स्मशानभूमीतील दानपेटीतून वर्षाभरात अवघे अकराशे रुपये निघाल्याने समाजातील दातृत्व कमी होतेय की काय, याबाबत शंका येते. काही मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे राज्यात मोफत अंत्यसंस्कार केले जातात. ( 1100 rupees in one year in donation box in Panchavati crematorium )

यात अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड, गोवऱ्या, रॉकेल व अन्य साहित्य यंत्रणेकडून मोफत दिले. त्यातून गर्भश्रीमंतापासून ते झोपडपट्टीतील मृतांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी सात ते आठ मण लाकूड लागते. याशिवाय रॉकेल, गोवऱ्या स्वतंत्र खर्च येतो. हा खर्च जनतेच्या करातून खर्च होतो, मात्र याला हातभार लागावा म्हणून नाशिक व पंचवटीतील मुख्य स्मशानभूमीत गुप्त दानपेटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

या दानपेटीत वर्षाभरात किती रक्कम जमा झाली, याची मनपाकडून पावसाळ्यापूर्वी इन कॅमेरा खातरजमा केली जाते. तीन दिवसांपूर्वी मनपा कर्मचाऱ्यांनी ही दानपेटी उघडली असता, अवघे १ हजार एकशे बत्तीस रुपये जमा झालेले आढळून आले. त्यात मोठ्या प्रमाणावर चिल्लरही आढळल्याने उपस्थित मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आश्‍चर्य व्यक्त केले.

Donation box in the cemetery.
Nashik News : शेती पडीक पण बांधासाठी जीवघेणी भांडणे! कळवण उपविभागीय पोलिस कार्यालयात 51 गुन्ह्यांची नोंद

जनतेचा सहभाग वाढावा : हरिश्‍चंद्र

राज्यात मोफत अंत्यसंस्कार योजना राबविणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था बोटावर मोजण्याइतक्याच आहे. त्यात नाशिक महापालिकेचा समावेश होतो. ही योजना राबविताना ज्यांच्या घरच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले, त्यांनी सामाजिक दायित्व राखत अशा योजनांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे मत महापालिका पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्‍चंद्र यांनी व्यक्त केले.

केवळ शासनाच्या व अन्य संस्थांच्या मदतीने असे उपक्रम वर्षानुवर्षे यशस्वीपणे चालू ठेवणे कठीण जाते. तेव्हा नागरिकांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून दानपेटीत फूल न फुलाची पाकळी टाकणे अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, अशी खंतही श्री. हरिश्‍चंद्र यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

''महापालिका मोफत अंत्यसंस्कार योजना राबविते, परंतु भावनात्मकदृष्ट्या विचार करता संबंधितांच्या आत्माच्या शांतीसाठी तरी किमान दानपेटीत काही रक्कम टाकली तर मृताच्या आत्म्यासही सद्गती प्राप्त होईल.''- निशिकांत पगारे, पर्यावरण कार्यकर्ते

Donation box in the cemetery.
Nashik News : ‘काश्‍यपी’ चे पाणी तत्काळ बंद करा! शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे धाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.