नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी, दिव्यांग मतदार व ८५ वर्षांवरील सुमारे १२ हजारांवर मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. उर्वरित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी १६ ते १८ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयातच मतदानाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती टपाली मतदानाच्या नोडल अधिकारी माधुरी आंधळे यांनी दिली. जिल्ह्यात २५ हजार २५२ कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी निवडणुकीची ‘ड्यूटी’ लागली आहे. (12 thousand voters exercised their right to vote by post in district )