Nashik News : अन्न, वस्त्र, निवारा या व्यक्तीच्या प्राथमिक गरजा होय. पण त्याचबरोबर वीजसुद्धा जीवनावश्यक बाब आहे. वीज हा प्रत्येकाच्या जीवनमानात अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे थोडाफार जरी वीजपुरवठा अनियमित झाला तरी शहर व ग्रामीण या दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणविरोधात तीव्र भावना नागरिकांच्या उमटतात. (1,285 million units of electricity demand in district)
वाढती मागणी आणि त्या बदल्यात पुरवठा यासाठी सर्व वीज कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत एक हजार २८५ दशलक्ष युनिट मागणी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये महावितरणचे दोन सर्कल आहेत. यात नाशिक व दुसरे मालेगाव होय. दोन्ही ठिकाणी कारखानदारी असल्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
वाढते उद्योगधंदे, तापमानात वाढ, लोकसंख्या, ग्राहक उत्पन्नवाढ, शहरीकरण विस्तार, शेती कामांसाठी विजेचा वापर, सीएफएलसारखे ऊर्जा बचत करणारी उपकरणे यामुळे विजेची मागणी या प्रमुख कारणांमुळे वाढली आहे. मागील काही वर्षांपासून ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. उद्योगधंद्यांची वाढ हे एक महत्त्वाचे कारण आहे.
मात्र, त्याचबरोबर इतरही अनेक कारणे आहेत. नाशिकमध्ये उद्योग-व्यवसायांची संख्या जास्त आहे. आर्थिक उलाढाल जास्त आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विजेच्या मागणीमध्ये २३.५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एक लाख ३३ हजार ६८६ वीजग्राहक वाढलेले आहेत. तापमानातील वाढलेली उष्णता, अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विजेच्या उपकरणांची गरज भासते. (latest marathi news)
नागरी वस्तीचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण होत आहे. आधुनिक शेती करत असताना जवळपास सर्वच उपकरणे विजेवर वापरली जातात. डिजिटल युगात तंत्रज्ञानामध्ये सर्वच वस्तूंच्या बॅटरी चार्जिंगसाठी विजेची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर्स, स्कॅनर, कॉम्प्युटर विविध अशा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश आहे. नाशिकमध्ये कारखानदारी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे.
जिल्ह्यामध्ये एमआयडीसी क्षेत्र असलेले तालुकेही अधिक आहेत. त्यामुळे विजेची अतिरिक्त मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. २०१९-२० जिल्ह्यातील नाशिकमध्ये चार हजार ३५० दशलक्ष मालेगाव सर्कलमध्ये एक हजार १२१ दशलक्ष युनिटची मागणी होती. २०२३-२४ मध्ये नाशिक सर्कलमध्ये पाच हजार ३९४ दशलक्ष व मालेगावमध्ये एक हजार ३६१ दशलक्ष युनिटची मागणी आहे. म्हणजेच नाशिकमध्ये एक हजार ४४ व मालेगावमध्ये २४० दशलक्ष युनिट मागणी वाढली आहे.
१९-२० मध्ये नाशिक सर्कलमध्ये १० लाख ७० हजार ३८६ वीजग्राहक होते. आजमितीस ११ लाख ६५ हजार ८३३ ग्राहक आहेत. यामध्ये ९५ हजार ४४७ इतक्या वीजग्राहकांची वाढ झाली आहे. तसेच मालेगाव सर्कलमध्ये तीन लाख ७३ हजार ५३९ ग्राहक होते. सध्या चार लाख ११ हजार ७७८ वीजग्राहक आहेत. ३८ हजार २३९ इतकी संख्या ग्राहकांची वाढली आहे.
नाशिक व मालेगाव सर्कलमधील वीजग्राहक व वीज मागणी
वर्ष वीज ग्राहकसंख्या वीज युनिट (दशलक्ष)
१९-२० १४,४३,९२५ ५,४७१
२०-२१ १४,७६,५६९ ५,५४४
२१-२२ १४,८४,५७४ ५,७२४
२२-२३ १५,२४,०२८ ६,२१४
२३-२४ १५,७७,६११ ६,७५६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.