Chief Minister Vayoshree Yojana : ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’त जिल्ह्यातून 1300 अर्ज! जळगावचे सर्वाधिक 15 हजार अर्ज

Nashik News : मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रतिसादानंतर ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ नुकतीच सुरू करण्यात आली आहे.
Chief Minister Vayoshree Yojana
Chief Minister Vayoshree Yojana esakal
Updated on

Nashik News : नाशिक विभागातून सदर योजनेसाठी १७ हजार ४६८ ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यात जिल्ह्यातून केवळ १ हजार ३०० वयोवृद्धांनी अर्ज सादर केले आहेत. याउलट जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक १५ हजार ६०० तर अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्वात कमी ६३४ प्राप्त झाले आहेत. (1300 applications from district in Chief Minister Vayoshree Yojana)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रतिसादानंतर ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ नुकतीच सुरू करण्यात आली आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली असली तरी नाशिक जिल्ह्यातील १३०० वृद्धांनी अर्ज केले आहेत.

वयोश्री योजनेच्या जनजागृतीबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये ३ हजार त्यांच्या बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व.

अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच त्यांचे मनः स्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून रुपये ३ हजार त्यांना मिळणार आहेत. पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा. (latest marathi news)

Chief Minister Vayoshree Yojana
Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेक्स, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगा उपचार केंद्र मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे. सदर योजनेची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते त्या सर्वेक्षणाबरोबरच या योजनेचा लाभार्थीची तपासणी करावी, असे शासनाचे आदेश आहेत.

Chief Minister Vayoshree Yojana
Nashik Dada Bhuse : जिल्हा बॅंक सक्तीच्या वसुलीविरोधात लवकरच बैठक : भुसे

महानगरपालिकास्तरावर आयुक्त महानगरपालिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण/जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची समिती मार्फत अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वरील सर्व संबंधित कार्यालयात संपर्क साधावा.

३१ डिसेंबर २०२३ रोजी वयाची ६५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्याच्याकडे आधार कार्ड असणे आहे. लाडकी बहिण योजनेनंतर जळगाव जिल्ह्यातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची खैरात केली जात असल्याची टीकाही बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.

Chief Minister Vayoshree Yojana
Nashik News : वणीकर डासांसह दुर्गंधीने त्रस्त! तुंबलेल्या गटारींमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना निमंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.