Nashik News : आशादायक ! ग्रंथोत्सवात तेरांशे पुस्तकांची विक्री; 13 विविध ग्रंथ वितरकांचा सहभाग

Nashik : मराठी भाषा गौरव दिन व नाशिक ग्रंथोत्सवात दोन दिवसात ग्रंथ प्रदर्शनात १३०७ ग्रंथ विक्रीतून तब्बल १ लाख ७५ हजार ६०० इतके उत्पन्न मिळाल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी दिली.
Readers inspecting books at a book festival.
Readers inspecting books at a book festival.esakal
Updated on

Nashik News : मराठी भाषा गौरव दिन व नाशिक ग्रंथोत्सवात दोन दिवसात ग्रंथ प्रदर्शनात १३०७ ग्रंथ विक्रीतून तब्बल १ लाख ७५ हजार ६०० इतके उत्पन्न मिळाल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी दिली. यामध्ये १३ विविध ग्रंथ वितरकांनी सहभाग नोंदविला होता. (nashik marathi language day marathi news)

ग्रंथालय संचनलय मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने आयोजित या ग्रंथोत्सवात वाचकांना वाङमयीन साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे म्हणून शासनाकडून सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात वितरकांना मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मराठी भाषा गौरव दिन व नाशिक ग्रंथोत्सवाचे आयोजन २७ व २८ फेब्रुवारी दरम्यान मु. शं. औरंगाबादकर सभागृहात करण्यात आले होते. यामध्ये विविध कार्यक्रमांसह वाचनालयाच्या आवारात ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री प्रदर्शन घेण्यात आले.

या ग्रंथोत्सवात पुस्तकांवर विशेष सवलत दिल्याने अनेक वाचनालयांनी मोठ्या संख्येने पुस्तक खरेदी केले. नाशिक जिल्ह्यात एकूण २९८ वाचनालय आहे. प्रत्येक वाचनालयाला मिळणाऱ्या अनुदानानुसार पुढील वर्षी या गंथोत्सवात प्रत्येक वाचनालयाने किमान १० हजार रुपयात पुस्तकांची खरेदी करावे असेही यावेळी ठरविण्यात आले. (latest marathi news)

Readers inspecting books at a book festival.
Nashik News : उपजिल्हाधिकारी भारदे यांची अवघ्या 7 महिन्यांत बदली

दरम्यान पार्किंग आणि जागेचा प्रश्न बघता पुढील वर्षी हा ग्रंथोत्सव मोकळ्या मैदानात घेण्यात यावा अशी मागणी वितरकांनी केली आहे. शासकीय मुद्रणालय (मुंबई), ज्योती बुक स्टोअर्स, नवनीत एज्युकेशन, वैशाली प्रकाशन (पुणे), विलास बुक एजन्सी, ग्रंथभवन प्रकाशन, पुण्ययोग प्रकाशन, रोहिणी बुक्स, इलिक एंटरप्राईज, सानिका प्रकाशन, रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, पुस्तक पेठ, नेहादित्य प्रकाशन

''मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा तर करतो पण शहरी व ग्रामीण भागात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या मुख्य उद्देशाने ग्रंथ संचनालय मुंबई व त्याच्या आधिपत्याखाली येणाऱ्या जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने प्रकाशक व पुस्तक विक्रेत्यांना मोफत जागा उपलब्ध करून दिली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.''- सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी

''दोन दिवसात २१४ पुस्तकांची विक्री झाली. ग्रंथपाल, जिल्हा वाचनालयातील मंडळी चौकशीसाठी येत होती. शिवाय ग्रंथोत्सवात खरेदीदारांसाठी पुस्तकांवर विशेष सवलत देण्यात आली होती.''-निखिल दाते, पुस्तक पेठ

Readers inspecting books at a book festival.
Nashik News : तपोवनातील मलनिस्सारण केंद्राचे पाणी थेट नदीपात्रात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.