Nashik News : मालेगाव तालुक्यातील 14 गावे टँकरमुक्त! 36 गावे, 83 वाड्यांना टॅंकर सुरूच

Nashik News : पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटले तरी देखील तालुक्यातील ३५ गावे व ८३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
Water tanker
Water tankeresakal
Updated on

मालेगाव : पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटले तरी देखील तालुक्यातील ३५ गावे व ८३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे १४ गावे टँकरमुक्ते झाले आहेत ही समाधाची बाब आहे. तालुक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. (14 villages in Malegaon taluka are tanker free)

बहुतांशी भागात शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही अंशी मार्गी लागत आहे. पावसामुळे ४९ पैकी १४ गावांमधील टँकर बंद झाले. तालुक्यात आजही ३६ गावे व ८३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यासाठी ४२ टँकरच्या माध्यमातून ८६ फेऱ्या मारल्या जात आहेत. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४९ गावे व ९८ वाड्यांना टँकर सुरू होते.

५५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. समाधानकारक पावसामुळे झाडी, चिंचवे (गा.), काष्टी, अजंग- सेक्शन सी, डोंगराळे, निमशेवडी, अस्ताने, टोकडे, झोडगे, जळकू, लखाणे, कुकाणे, वळवाडी व मांजरे या चौदा गावांमधील टँकर बंद झाले आहेत. आणखी दोन- तीन मुसळधार पाऊस झाल्यास टँकरची संख्या घटू शकेल. (latest marathi news)

Water tanker
Nashik News: आरोग्‍य विद्यापीठ अधिसभेवर ऋषीकेश, सदाकांत, श्रीतेज; विद्यार्थी परिषदेच्‍या सर्व 9 जागांवर बिनविरोध निवड

मालेगाव तालुक्यात पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. असे असले तरी भिज पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तरच पाणीपुरवठा योजनांचे जलस्त्रोत व विहिरींना पाणी उतरेल. तालुका टँकरमुक्त होण्यासाठी जुलैमध्ये होणाऱ्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे.

सध्याची पाणी टंचाईची स्थिती

टंचाईग्रस्त गावे - ३६

टंचाईग्रस्त वाड्या - ८३

एकूण टँकर - ४२

एकूण फेऱ्या - ८६

गावांसाठी विहिरी अधिग्रहीत- ०८

टँकर भरण्यासाठी विहिरी अधिग्रहीत - ३५

Water tanker
Nashik ZP News : जिल्हा परिषदेत 78 कर्मचाऱ्यांचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.