नाशिक : जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा, शासकीय- निमशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था व शाळा-महाविद्यालयांनी मतदानासंदर्भात केलेल्या जनजागृतीची चांगली फलश्रुती दिसली. मोठ्या आर्थिक उलाढालींनीही हातभार लागला. दुपारनंतर मतदारराजा घराबाहेर पडला. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत सरासरी सात टक्क्यांनी मतदान वाढले. आता हे वाढलेले मतदान कोणत्या उमेदवाराच्या छातीत कळ आणणार अन् कुणाला पाठबळ देणार, याचीच चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.