Nashik News : सुरगाण्यात होणार सफेद मुसळी शेतीचे पुनरुज्जीवन; स्वदेस फाउंडेशनचा पुढाकार

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम गाव विकास समितीच्या सहकार्यातून केले जात आहे.
White Musli
White Musliesakal

Nashik News : रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम गाव विकास समितीच्या सहकार्यातून केले जात आहे. नाशिक जिल्ह्यात १५० गावांमध्ये स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, सक्षम, आत्मनिर्भर यावर विषयावर आधारित स्वप्नातील गावे स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्यातून बनत आहेत. (150 villages in Nashik district villages based on theme of clean are being built with cooperation of Swades Foundation)

त्यातूनच उच्च मूल्याचे पीक असूनही सफेद मुसळीच्या लागवडीची किंमत जास्त असल्याने फक्त काही शेतकरीच त्याची लागवड करतात. त्यामुळे आता सफेद मुसळीच्या शेतीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील सुळे येथे ३ शेतकरी स्वतः सफेद मुसळीचे पीक घेत होते.

त्यांच्यापासून प्रेरित होऊन २८ शेतकऱ्यांनी पीक घेतले. २०२३ मध्ये प्रायोगिक तत्वावर स्वदेस फाउंडेशनने ८२ शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी पाच गुंठ्यासाठी १७ हजार ५०० रुपयांचे बियाणे घेत प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. यामध्ये सुळे, विजयनगर, पालविहीर येथील ७१ व इगतपुरी येथील घोडेवाडी, सोनोशी व काळूस्ते येथील ११ शेतकऱ्यांचा सहभाग होता. सफेद मुसळी उच्च मूल्याचे औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे जी प्रतिकार शक्ती वाढविण्यास आणि मुख्यत्वे स्त्री-रोगावर उपचार करण्यास मदत करते.

तथापि, अनिर्बंध विनाशकारक संकलन आणि वास्तव्याच्या हानीमुळे सफेद मुसळी (क्लोरोफायटम बॉरिविलिअॅनम) ही जागतिक प्रकृति संरक्षण संघटनेच्या (IUCN) लाल यादीत अत्यंत धोक्यात आहे. स्वदेस फाउंडेशनच्या सहाय्याने नाशिकमधील पारंपारिकरित्या भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांची विविधता आणण्यास मदत झाली आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. (latest marathi news)

White Musli
Nashik News : दिंडोरीतील पश्‍चिम पट्ट्यातील शाळांची अवस्था दयनीय

यावर्षी ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवडीची तयारी केली असून, तशी मागणी ‘स्वदेस’कडे नोंदवलेली आहे. सफेद मुसळीचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्वदेसच्या संचालिका निता हरमलकर, वरिष्ठ व्यवस्थापक शितल डांगे, स्वदेस फाउंडेशन टीम व गाव विकास समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापणार

नाशिकमधील सफेद मुसळी शेतीसाठी अनुकूल हवामान असलेल्या स्वदेस फाउंडेशनच्या कार्यक्षेत्रात मागणी वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नाशिकमधील ४ तालुक्यांमध्ये स्वदेस यावर्षी ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे हे पीक पोहोचविण्याचे नियोजन करीत आहे. तसेच, सफेद मुसळीसाठी देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करण्याची तयारी करीत आहे.

"सफेद मुसळी हे उच्च मूल्याचे पीक आहे जे गरीब शेतकऱ्यांना त्या उत्पन्नाच्या कक्षेतून बाहेर काढण्यास खरोखरच मदत करू शकते. हे कमी देखभालीत होणारे, उच्च परतावा देणारे पीक आहे आणि विशेषत: नाशिकमधील हवामान आणि प्रदेशासाठी उपयुक्त आहे. ५ गुंठ्यावर शेतकऱ्यांना जवळपास २८ हजार रुपये मासिक उत्पन्न मिळवून देणाऱ्‍या प्रायोगिक उपक्रमाच्या निकालावरून आम्हाला खूप विश्‍वास आहे आणि यावर्षी सफेद मुसळीच्या पहिल्या टप्प्यात ७०० हून अधिक शेतकऱ्यांकडे हे पीक पोहोचविण्यास आम्ही तयार आहोत." - मंगेश वांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वदेस फाउंडेशन

White Musli
Nashik Rural Police Recruitment: ग्रामीण पोलीस भरतीच्या धावण्याची चाचणी 19 पासून! भुजबळ नॉलेज सिटीतील वाहतूक मार्गात बदल

लागवडीसाठीचे नियम

शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे मूल्य असणाऱ्या ‘सफेद मुसळी’ या पिकाची लागवड करण्यासाठी सक्षम बनविणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा मिळवून देणे. सफेद मुसळीच्या लागवडीस अनुकूल जमिन व हवामान, जमिन भुसभुशीत असावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन, सेंद्रिय युक्त, जमिनीचा सामु ६ ते ७ असावा. उष्ण व दमट हवामान योग्य, पावसाळा लागवडीसाठी उत्तम होय. १ जून ते १५ जुलैदरम्यान १-२ चांगले पाऊस पडल्यावर लागवड करावी.

बियाण्याचे प्रमाण आणि पेरणीची पद्धत

• प्रति एकर ३५० ते ४०० किलो बेणे (मुसळी कंद)

• एका जुपक्यात कमीतकमी ३ मुसळ्या असाव्यात

• प्रति एकर १६ हजार कंदांची आवश्‍यकता

व्यवसायाचे आर्थिक गणित

• देशातील वार्षिक मागणी : ५०० टन

• उत्पादन प्रती एकरी : ४५० ते ५०० किलो

• दर प्रतीकिलो : सरासरी ९०० रुपये किलो

White Musli
Nashik News : मुंबईत खासदार वाजेंकडून शरद पवार यांचा सत्कार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com