Nashik News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचतपत्र योजना’ जाहीर केली होती. या योजनेचा ३१ जुलैपर्यंत नाशिक शहरातील सुमारे १६ हजार ४५१ महिलांनी लाभ घेतल्याची माहिती जिल्हा टपाल कार्यालयातील वरिष्ठ टपाल अधिकारी गोपाल पाटील यांनी दिली. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ही योजना सर्व वयोगटांतील महिला व मुलींसाठी लागू असणार आहे. (16 thousand women benefited from mahila Samman Savings Certificate )