Nashik News : लासलगाव ग्रामपंचायतीकडून 18 दुकानांना सील! 28 लाखांची थकीत करवसुली

Nashik News : ग्रामपंचायत हद्दीत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भाड्याची वसुली ग्रामविकास अधिकारी ज्योर्तिलिंग जंगम व ग्रामपंचायत कर्मऱ्यांनी सुरू केली आहे
Gram Panchayat staff sealing the shop in arrears. Neighbors Village Development Officer Jangam etc.
Gram Panchayat staff sealing the shop in arrears. Neighbors Village Development Officer Jangam etc.esakal
Updated on

लासलगाव : ग्रामपंचायत हद्दीत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भाड्याची वसुली ग्रामविकास अधिकारी ज्योर्तिलिंग जंगम व ग्रामपंचायत कर्मऱ्यांनी सुरू केली आहे. सोमवारी (ता. ४) १८ दुकानांना सील करण्यात आले. अनेक मालमत्ताधारकांनी सुमारे २५ वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भाड्याची रक्कम भरलेली नाही.

त्यामुळे ग्रामपंचायत (Gram Panchayat) प्रशासनास जप्तीची कारवाई करावी लागत आहे. नागरिकांनी वेळेवर शासकीय कर भरावेत, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी जंगम यांनी केले आहे. (Nashik 18 shop sealed by Lasalgaon Gram Panchayat marathi news)

लासलगाव ग्रामपंचायतीची मोठी व्यावसायिक मालमत्ता आहे. मालमत्तांच्या कराची रक्कम लाखो रुपयांच्या घरात जाते. सध्या सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची जागा भाडे कर थकीत आहे. थकीत कराची वसुली होत नसल्यामुळे विकासकामे ठप्प होत आहेत.

ही बाब गांभीर्याने घेत ग्रामविकास अधिकारी ज्योर्तिंलिंग जंगम, ग्रामपंचायत कर्मचारी ऋषिकेश वाघ, पवन सानप, रुपेश पवार, माणिक शिंदे, रोशन गायकर, मंगेश अहिरे, जनार्दन गोसावी, संतोष कोरे, रमाकांत भावसार आदींनी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे.

(Latest Marathi News)

Gram Panchayat staff sealing the shop in arrears. Neighbors Village Development Officer Jangam etc.
Sanjay Rathod : तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ; ग्रामीणमध्ये प्रयोगशाळेचे उद्‍घाटन

ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचा धसका घेऊन मागील दोन दिवसांत घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भाडेपोटी २८ लाख रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. सोमवारी (ता. ४) १८ दुकाने सील केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी जंगम यांनी दिली.

लासलगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मालमत्ता असून, त्या मालमत्तांना अजूनही मालमत्ता कर आकारणी केलेली नाही. अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर दंडासह मालमत्ता कर आकारणी करून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढ केली जाईल, तसेच बिनशेती क्षेत्रासही आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी ज्योर्तिलिंग जंगम यांनी दिली.

Gram Panchayat staff sealing the shop in arrears. Neighbors Village Development Officer Jangam etc.
Nashik News: गंगापूर, बारा बंगला थेट पाइपलाइनला हिरवा कंदील! पुढील 30 वर्षांपर्यंतचा पाणी प्रश्‍न सुटणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.