Nashik ZP School : राज्य शासनाने विद्यार्थिंनीच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार २५८ शाळांमध्ये १२ हजार वर्ग खोल्या असून प्रत्येक शाळा परिसराला अंदाजे ६ हजार अशा एकूण सर्व शाळांना १८ हजार कॅमेरे बसविले जाणार आहेत. (18 thousand CCTV camera to zp school )