Nashik : येवल्यात 18 हजार विद्यार्थी गणवेशाविना; दिवाळीची सुट्टी आली तरीही प्रतीक्षा

Nashik : गतिमान सरकार अशी जाहिरात बाजी करून लाडक्या बहिणींना दरमहा वेळेत पैसे देणाऱ्या सरकारने जुन्या योजनांना मात्र कोपरा दाखविला आहे.
Officials of Sharad Pawar faction of NCP giving a statement to Group Education Officer Sanjay Kusalkar regarding uniforms.
Officials of Sharad Pawar faction of NCP giving a statement to Group Education Officer Sanjay Kusalkar regarding uniforms.esakal
Updated on

येवला : गतिमान सरकार अशी जाहिरात बाजी करून लाडक्या बहिणींना दरमहा वेळेत पैसे देणाऱ्या सरकारने जुन्या योजनांना मात्र कोपरा दाखविला आहे. म्हणूनच की काय लाडक्या बहिणींचे लाड करत असताना लाडके भाचे मात्र दुर्लक्षित राहिले असून दिवाळीची सुट्टी जवळ आली तरी तालुक्यातील २३६ शाळातील एकाही विद्यार्थ्याला अद्याप मोफत गणवेश मिळालेला नाही.यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे. (18 thousand students came without uniform in district )

शाळा सुरू होण्यासाठी नव्हे तर आता शाळेला सुट्टी लागण्यासाठी अवघा २५ दिवसांचा कालावधी उरला असताना समग्र शिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत गणेशाचे गुऱ्हाळ मात्र अजून थांबलेले नाही. यामुळे पहिल्या दिवशी गणवेश ही घोषणा हवेतच विरली आहे. यावर्षी नव्याने आदेश काढत शासनाने नियमित व स्काऊट गाईड असे दोन गणवेश देण्याचे निश्चित केले आहे. शिलाई बचत गटामार्फत सुरू असल्याचे उत्तर जूनपासून मिळत आहे.

स्काऊट गाईडचा गणवेश शाळास्तरावरच मिळणार असून यासाठी कापड देऊन शालेय समितीला फक्त ११० रुपये शिलाईसाठी देण्यात येणार असल्याची घोषणा झाली, मात्र त्या संदर्भात कुठल्याच हालचाली अद्यापही झालेल्या नाहीत. यावर्षी तालुक्यातील सर्व २३६ शाळातील अंदाजे १८ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाळलेला नसल्याने मागच्या वर्षीचे जुने कपडे किंवा रंगीबेरंगी कपडे घालूनच अद्यापही शाळेत येण्याची वेळ येत आहे. (latest marathi news)

Officials of Sharad Pawar faction of NCP giving a statement to Group Education Officer Sanjay Kusalkar regarding uniforms.
Nashik News : सिडकोचा भूखंड भाडेपट्टामुक्तीचा निर्णय; आता मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष

एकीकडे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये शासनाने भेट सुरू केली या योजनेचे स्वागत असले तरी जुन्या योजनांना यामुळे फटका बसत असून भाच्यांनाच सरकार गणवेश देऊ शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने याबाबत निवेदन देऊन शिक्षणविभागाकडे विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची मागणी केली आहे.

''गटशिक्षणाधिकारी कुसाळकर यांना गणवेशाबाबत विचारणा केली. आता सहामाही परीक्षा जवळ आली असूनही विद्यार्थ्यांना गणवेश दिलेले नसल्याने शासनाचा नाकर्तेपणा यातून दिसत आहे.''- योगेश सोनवणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष

''अजूनही विद्यार्थी गणवेशाविना शाळेत येतात. शिलाई सुरू असल्याचे सांगितले जाते मात्र गणवेश मिळालेले नाही तसेच दुसरा गणवेश शाळा स्तरावर न देता शासनाने द्यावा."- बाजीराव सोनवणे,राज्य प्रतिनिधी,राज्य प्राथमिक शिक्षक संघ

Officials of Sharad Pawar faction of NCP giving a statement to Group Education Officer Sanjay Kusalkar regarding uniforms.
Nashik News : ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे गावातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.