किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : अक्राळे (ता. दिंडोरी) ‘एमआयडीसी’तील छोट्या व मध्यम स्वरूपाच्या ४७ प्लॉटसाठी तब्बल १९६ व्यक्तींनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी करून पुढील आठवड्यात त्यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. (Nashik Akrale MIDC Industries marathi news)
अक्राळे ‘एमआयडीसी’साठी ३३७ हेक्टर जमीन संपादित करण्याचा निर्णय झाला आहे. त्यापैकी २५५ हेक्टर जागा ‘एमआयडीसी’ने यापूर्वीच ताब्यात घेतली असून, मूलभूत सुविधांची जागा वगळता उर्वरित १४१.८२ हेक्टरवर कारख्यान्यांची उभारणी होणार आहे. त्यावर छोट्या व मध्यम स्वरूपाचे उद्योग उभारण्यासाठी ४७ प्लॉट विक्रीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली.
त्यानुसार जिल्ह्यातील उद्योजकांनी यात सहभाग घेतला आणि किमान सहा ते जास्तीत जास्त १६ अर्जदारांनी एका प्लॉटसाठी अर्ज केले आहेत. एक हजार ते तीन हजार स्क्वेअर मीटरपर्यंत या प्लॉटचा आकार आहे.
साधारणतः तीन हजार रुपये स्क्वेअर मीटर या शासकीय दराने हे प्लॉट विक्रीस उपलब्ध असले तरी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला तो देण्यात येणार आहे. यासाठी ‘एमआयडीसी’ने सर्व अर्जदारांची एकत्रित बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. फूड व सर्वसाधारण उद्योगांसाठी हे प्लॉट उपलब्ध आहेत.
रिलायन्स, इंडियन ऑइलची मोठी गुंतवणूक
रिलायन्स उद्योगसमूह व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी नाशिकमध्ये चार हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. ‘एमआयडीसी’ने त्यांना अक्राळे येथे अनुक्रमे १६० व ५० एकर जागेचा ताबा दिला आहे.
रिलायन्स उद्योगसमूहाची ‘रिलायन्स लाइफ सायन्स’ ही कंपनी लस व औषधनिर्मिती करणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन क्रायोजेनिक टॅंक तयार करणार आहे. हे दोन उद्योग सुरू झाल्यानंतर जवळपास पाच हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. (Latest Marathi News)
बोलके आकडे
३७२ हेक्टर : अक्राळे ‘एमआयडीसी’चा एकूण एरिया
२५५.९१ हेक्टर : जागा अधिग्रहित झाली
३० हेक्टर : जागेचे अधिग्रहण रद्द
८६ हेक्टर : जागेचे भूसंपादन बाकी
१२.८० हेक्टर : मूलभूत सुविधा उभारणार
"अक्राळे ‘एमआयडीसी’तील भूखंडांसाठी अर्ज केलेल्या सर्वांची एकत्रित बैठक घेण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. अर्जाची छाननी झाल्यानंतर आठवडाभरात ही बैठक होईल."
- नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.