Nashik News : बांधकाम Online परवानग्यांमध्ये नाशिक राज्यात प्रथम

Construction Online Licence
Construction Online Licenceesakal
Updated on

नाशिक : बांधकामांच्या ऑनलाइन परवानग्यांसंदर्भात व्यावसायिकांकडून तक्रार होत असली तरी नाशिक शहर ऑनलाइन परवानग्यांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे, नागपूर व औरंगाबाद या महापालिकांपेक्षाही नाशिकमध्ये ऑनलाइन परवानग्यांना प्रतिसाद मिळत आहे.

बांधकाम व्यावसायिक वास्तुशास्त्र व बांधकामाच्या परवानगी देणारी यंत्रणा यामध्ये समाधानबरोबरच परवानग्यांची क्लिष्ट पद्धत बंद होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने युनिफाइड डीसीपीआरमध्ये ऑनलाइन परवानग्या देणे बंधनकारक केले. नाशिक महापालिकेत १ एप्रिलपासून बांधकामांच्या ऑनलाइन परवानगी दिल्या जात आहेत. (Nashik 1st in state in Online Construction Permits Nashik News)

Construction Online Licence
Rajya Natya Compition : कसब पणाला लावून उभा केला ‘गावगाडा’

ऑनलाइन परवानगीसंदर्भात बांधकाम व्यावसायिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या सॉफ्टवेअरऐवजी टीसीएस सॉफ्टवेअरची मागणी व्यावसायिकांची आहे. यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.

राज्य शासनाने मुंबई व राज्यातील इतर महापालिकांमध्ये ऑनलाइन बांधकाम परवानगी, यासाठी आग्रह धरला आहे. त्यासाठी स्पर्धादेखील घेतली जात आहे.

त्यात गेल्या तीन-चार महिन्यांतील अहवालानुसार नाशिक महापालिका ऑनलाइन परवानग्यांमध्ये आघाडीवर आहे. नाशिक महापालिकेकडे चार हजार ५९६ ऑनलाइन प्रकरण दाखल झाली. त्यातील तीन हजार ६७४ प्रकरणे मंजूर करण्यात आली, तर ६० प्रकरणे नाकारण्यात आले. सध्या ८६२ प्रकरणे ऑनलाइन प्रक्रियेत आहेत. नाशिकखालोखाल अकोला, त्यानंतर औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व ठाणे महापालिकांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Construction Online Licence
Credai Shelter 2022 : पहिल्याच दिवशी १५ हजार नागरिकांची प्रदर्शनाला भेट

ऑनलाइन परवानग्यांचा गोषवारा

महापालिका परवानगी

नाशिक ४,५९६

अकोला ३,५७४

औरंगाबाद १,८२१

नागपूर १,२७३

कोल्हापूर १,१३५

ठाणे २८०

Construction Online Licence
Nashik Krushithon Exhibition : शेतकऱ्यांना संकटे पार करण्याची ताकद ‘कृषिथॉन’ मधून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.