Nashik News : 2 दिवसात शहरात 19 झाडे उन्मळले; सर्वाधिक गुलमोहर

Nashik : दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने शहराच्या विविध भागात १९ वृक्ष आणि दोन वृक्षांच्या फांद्या कोसळल्याची घटना घडली.
tree fall
tree fall esakal
Updated on

Nashik News : दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने शहराच्या विविध भागात १९ वृक्ष आणि दोन वृक्षांच्या फांद्या कोसळल्याची घटना घडली. तसेच ४ ठिकाणी धोकादायक वाडे घर कोसळण्याचे प्रकार घडले. शहरात शनिवार (ता. ३) आणि रविवार (ता. ४) या दोन्ही दिवशी सतत जोरदार पाऊस झाला. दोन दिवस पावसाने उघडण्याचे नाव घेतले नव्हते. गोदावरी नदीसही पहिला पूर आला. दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या विविध भागात १९ वृक्ष आणि दोन वृक्षांच्या फांद्या कोसळण्याचे प्रकार घडले. (2 days 19 trees were uprooted in city most of them Gulmohar )

यात सर्वाधिक १० वृक्ष सातपूर भागात तर मुख्यालय हद्दीत ४ वृक्ष कोसळले. वाहनांवर तसेच रस्त्यावर वृक्ष कोसळून काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सुमारे १५० वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. यात सर्वाधिक गुलमोहर प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. कॉँक्रिटीकरण आणि स्मार्टसिटीअंतर्गत कामानिमित्त होणारे खोदकाम, वृक्षांची एकाच बाजूची छाटणी यामुळे अशा प्रकारे वृक्ष कोसळण्याच्या घटना घडत आहे. (latest marathi news)

tree fall
Nashik News : वीजपुरवठा बंद न करताच काम करताना दोघांचा मत्यू; विटावे येथील घटना

असे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेकडून नियोजन करण्यात यावे. अशी मागणी होत आहे. दरम्यान काझीगढी येथे दोन घरी कोसळण्याची घटना घडली. त्याचप्रमाणे झारेकरी कोट येथे एक घर तर पिंजार घाट भागात जुन्या वाड्याचा भाग असलेले बेकरी कोसळण्याची घटना घडली आहे. अशाप्रकारे गेल्या दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने नाशिककरांची तारांबळ उडवून दिली.

विभागनिहाय वृक्ष कोसळण्याच्या घटना

सातपूर........१०

सिडको........०३

मुख्यालय.......०४

पंचवटी.........०२

नाशिक रोड......०२

tree fall
Nashik News : ‘जेएनपीए’चे शैक्षणिक संस्‍थांना बळ; ‘सीएसआर’ निधीतून सीएचएमईला 50 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.