Nashik Monsoon : 2 दिवसांच्या पावसाने देवनदी प्रवाहीत; देवपूर बंधाऱ्यात पाण्यामुळे शेतीला मोठा आधार

Nashik Monsoon : दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
Devnadi flowing in Fardapur
Devnadi flowing in Fardapuresakal
Updated on

Nashik Monsoon : दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. देवनदी प्रवाहीत झाली आहे. देव नदीचे पाणी देवपूरच्या बंधाऱ्यात कुंदेवाडी सायाळे पुरचारीमुळे अनेक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पश्चिम भागात पावसाने मागील आठवड्यात हजेरी लावल्यामुळे कोनाबे धरण भरल्यावर खाली पूर्व भागात पाणी प्रवाहित झाले होते. (2 days of rain water in Devpur dam in Devnadi stream has provided big support to agriculture )

शनिवारी व रविवारी पावसाने सिन्नर तालुक्यासह अनेक भागात जोरदार हजेरी लावल्याने पावसाचा जोर वाढलेला असताना देव नदीचे पाणी मुसळगाव मार्गे फरदापुर येथील देवनदीत आल्याने पुढे देवपूर मार्गे ते सोमठाणे येथे एक दोन दिवसात जाईल अशी अपेक्षा आहे. देवनदी प्रवाहीत झाल्याने या भागातील अनेक क्षेत्र व बंधारे ओढेनाले यांना नवसंजीवनी मिळणार असून अनेक क्षेत्रांवर पिकांना या देव नदी पाण्याचा फायदा होणार आहे. कुंदेवाडी सायाळे या पूरचारीचाही अनेक भागांना फायदा होऊन अनेक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

मेन्टनन्स फ्री योजना

कुंदेवाडी ते सायाळे ३४ किलोमीटर अंतराची, तर खोपडी ते मिरगाव ही २८ किलोमीटर अंतराची देवनदी बंदिस्त पूरचारी योजना आहे. राज्यातील पहिली मेन्टेनन्स फ्री योजना म्हणून या योजनेकडे बघितले जाते. बंदिस्त जलवाहिण्याची हि योजना असून तिला विजेचा खर्च नाही. पाणी उचलण्यासाठी विद्युत पंप नाही. केवळ गुरुत्वाकर्षणाने हे पाणी पूर्व भागात खळाळणार आहे. (latest marathi news)

Devnadi flowing in Fardapur
Nashik Monsoon : सिन्नर तालुक्यातील दुसरे कोनांबे धरण भरले; देवनदी प्रवाहित

पूर्व भागाला संजीवनी

सिन्नर तालुक्यात गत वर्षाच्या तुलनेत यंदा खरिपात वाढ झाल्याने उत्पन्नात सोयाबीन, मका, बाजरी, यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. या पिकांना या दोन दिवसाच्या पावसामुळे नव संजीवनी मिळणार असून पूर्व भागात पावसाअभावी कोमजलेल्या पिकांना या पावसामुळे नक्कीच वरदान मिळणार असून पिके पुन्हा जोमाने उभे राहणार असल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले.

खड्यांचा त्रास

दरम्यान पावसामुळे संगमनेर नाका, सिन्नर शिर्डी रोड, बारागाव पिंपरी रोड आधी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. दोन दिवसाच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्डे उघडे पडल्याने त्यामध्ये पाणी साचून दुचाकी पादचारी यांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांत पाणी साचल्याने प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Devnadi flowing in Fardapur
Nashik Monsoon : नार-पार, तान-मान, अंबिका नद्यांना पूर; सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.