Nashik News : वटार सर्पदंश प्रकरणी 2 डॉक्टर निलंबित; जिल्ह्यात सर्पदंशाच्या 834 लस उपलब्ध

Nashik : वटार (ता. सटाणा) येथील तीनवर्षीय बालकाचा सोमवारी (ता. २४) पहाटे झोपेतच सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी दोन महिला डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
doctor suspended
doctor suspendedesakal
Updated on

Nashik News : वटार (ता. सटाणा) येथील तीनवर्षीय बालकाचा सोमवारी (ता. २४) पहाटे झोपेतच सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी दोन महिला डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यासंदर्भातील चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सादर केल्यानंतर राज्य शासनाने ही कारवाई केली. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाच्या औषध भांडारात सद्यःस्थितीला ७० लस उपलब्ध असून, आरोग्य केंद्रांच्या मागणीप्रमाणे पुरवठा केला जात आहे. ( 2 doctor suspended in Water snakebite case )

शेतातील राहत्या घरात सागर ज्ञानदेव खैरनार यांचा स्वराज हा एकुलता एक मुलगा झोपलेला असताना पहाटेच्या सुमारास तो अचानक जोराने रडल्याने पालकांना जाग आली. त्या वेळी त्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार तत्काळ त्यास वाहनाने जवळील वीरगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता बोरसे, डॉ. तृप्ती शिंदे उपस्थित नव्हत्या. उपचारांअभावी स्वराजचा मृत्यू झाला. (latest marathi news)

doctor suspended
Nashik News : आधी थकीत देणी द्या, मग, हस्तांतरण करा! वसाका मजदूर युनियनचा आंदोलनाचा इशारा

डॉ. बोरसे या कंत्राटी, तर डॉ. शिंदे या प्रोबेशन पद्धतीने सेवा देत होत्या. त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांची सेवा खंडित करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाला २९ मार्च २०२४ ला सर्पदंशाच्या ८३४ लस प्राप्त झालेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मागणीप्रमाणे ७६४ लसींचे वितरण झाले आहे. सद्यःस्थितीला ७० लस उपलब्ध असल्यामुळे पावसाळ्यातील मागणीच्या दृष्टीने आरोग्य विभागाने एक हजार ८०० लस विकत घेण्याचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविला आहे. त्या लसही लवकरच उपलब्ध होतील.

''आरोग्य विभागाच्या कामात हलगर्जी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येते. त्यामुळे कोणाचाही कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपली सेवा द्यायला हवी.''- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक

doctor suspended
Nashik News : ब्रँडेड उत्पादकांकडून कीटकनाशकांचा वापर नाही; महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.