Nashik News : व्हॅन, बस चालकांना 2 तासांचे प्रशिक्षण बंधनकारक! RTOकडे परवाना नुतनीकरणावेळी द्यावे लागणार प्रमाणपत्र

Nashik News : महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टिने स्कूल बस अधिनियमानुसार नियमावली तयार केली आहे.
License Renewal
License Renewalesakal
Updated on

नाशिक : परिवहन संवर्गातील वाहन चालकांचे लायसन्स नूतनीकरण करताना संबंधित वाहन चालकांना दोन तासांचे उजळणी प्रशिक्षण वर्ग पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टिने स्कूल बस अधिनियमानुसार नियमावली तयार केली आहे. (Nashik 2 hours training mandatory for van bus driver license renewal with RTO news)

प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ, नाशिक यांनी परिवहन आयुक्तांचे परिवहन संवर्गातील वाहन चालकांचे लायसन्स, गाडीची नोंदणी, परमीट नूतनीकरण करताना संबंधित वाहन चालकांना प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. यामुळे अपघात टाळण्यासाठी मदत होईल.

कारण नूतनीकरण होताना ड्रायव्हरचे उजळणी प्रशिक्षण घेतल्यामुळे निश्चितच, योग्य रीतीने वाहतूक नियम कसे पाळायचे याबद्दलचे ज्ञान पुन्हा एकदा उजळणी होईल. तसेच यामधून आरटीओ विभागाच्याही संबंधित ड्रायव्हरला किती ज्ञान आहे, हे लक्षात येईल.

नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांतील स्कूल बस/खासगी स्कूल व्हॅन चालकांना हे दोन तासांचे उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन वर उल्लेख केलेल्या दिवशी कोणत्याही एका दिवशी घेणे आरटीओतर्फे बंधनकारक करण्यात आले आहे. (latest marathi news)

License Renewal
Nashik Lok Sabha Election 2024: मतमोजणी केंद्रावर ‘जॅमर’ बसवा; शिवसेना (उबाठा) गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

वाहन चालकांची हा अनुज्ञप्ती नूतनीकरण करणे तसेच वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना हे उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. नाशिक शहर व कार्यालयाचे कार्यक्षेत्रामध्ये सुमारे २३४८ स्कूल बस वाहनांना विद्यार्थी वाहतुकीसाठी परवाने जारी केलेले असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे.

मे व जून महिन्यात प्रशिक्षण

परिवहन कार्यालय व नाशिक फर्स्ट यांच्यातर्फे प्रबोधनपर उजळणी प्रशिक्षण वर्गाचे ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या वाहन चालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण संपूर्ण मे व जून महिन्यामध्ये आठवड्यातील प्रत्येक सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते १ व दुपारी ३ ते ५ पर्यंत अशा दोन स्वतंत्र सत्रांत नाशिक फर्स्टतर्फे ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, तुपसाखरे लॉन्स मागे, आयोजित केले आहे.

License Renewal
Nashik News : स्वामी समर्थांच्या पादुका 29 ला शहरात! विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांना मिळणार दर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()