नाशिक : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगातर्फे गेल्या महिनाभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत होते. परंतु, सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील २० लाख १८ हजार ८२१ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. या वेळी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली नाही.