Nashik News : एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार पडली आहे. विविध सत्रांमध्ये झालेल्या या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील २० हजार ८७५ विद्यार्थी सामोरे गेले. तर ९९२ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. उपस्थितीचे प्रमाण ९५.४६ टक्के राहिले. दरम्यान मे महिन्यात पीसीबी या ग्रुपची परीक्षा पार पडणार आहे. ( 20 thousand 875 students of district give exam)
अभियांत्रिकी (बीई, बी.टेक), औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्म), कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्यस्तरावर एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रवेशासाठी होत असलेली ही परीक्षा दोन टप्यात होत आहे. यापैकी पहिल्या टप्यात पीसीबी ग्रुपच्या परीक्षेची प्रक्रिया मंगळवारी (ता.३०) पूर्ण झाली.
२२ एप्रिलपासून परीक्षेला सुरवात झाली होती. विविध सत्रांमध्ये पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपच्या परीक्षांसाठी अर्ज केलेले आहेत. त्यामुळे आता पीसीबी ग्रुपची परीक्षा संपली असली तरी मे महिन्यात होणार असलेल्या पीसीएम ग्रुपच्या परीक्षेच्या तयारीला विद्यार्थ्यांनी सुरवात केली आहे. (Latest Marathi News)
जीवशास्त्राचेच प्रश्न राहिले अवघड
संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) या परीक्षेत सकाळी आणि दुपार सत्रात पेपर घेण्यात आले. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या प्रश्नांचा समावेश केलेला होता. दरम्यान जीवशास्त्राच्या प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक राहिल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.
एमएचटी-सीईटीतील
'पीसीबी' ग्रुपची स्थिती
प्रविष्ट झालेले विद्यार्थी २१८६७
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी २०८७५
गैरहजर विद्यार्थी ९९२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.