Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगीदेवीचे 20 हजार भाविकांनी घेतले दर्शन

Saptashrungi Devi Temple : चैत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आदिमाया सप्तश्रृंगीच्या सुमारे २० हजार भाविकांनी दर्शन घेतले.
Adimayes wears a yellow colored Mahavastra and adorns it with golden ornaments.
Adimayes wears a yellow colored Mahavastra and adorns it with golden ornaments.esakal
Updated on

Saptashrungi Devi Temple : चैत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आदिमाया सप्तश्रृंगीच्या सुमारे २० हजार भाविकांनी दर्शन घेतले. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील हजारो पदयात्रेकरु सप्तश्रृंगी गडाच्या रस्त्याने दिशेने मार्गक्रमण करीत गडापासून शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत दाखल झाले आहेत. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात बुधवारी (ता. १७) सकाळी दागिन्यांची पूजा केल्यानंतर अलंकारांची मिरवणूक काढण्यात आली. ()

बुधवारच्या तुलनेने गुरुवारी (ता. १८) भाविकांची गर्दी कमी प्रमाणात होती. देवीची पंचामृत महापूजा संस्थेचे विश्‍वस्त तथा कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी कुटुंबासह केली. यावेळी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्‍वत दीपक पाटोदकर, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी कर्मचारी व भाविक उपस्थित होते.

यात्रोत्सव काळात भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये यासाठी गडावर मंदिर, पहिली पायरी, शिवालय तलाव, न्यासाचे कार्यालय उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे महिलासंह भाविकांनी दागदागिने, पॉकीट, मोबाईल सांभाळण्याबरोबर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करण्याचे उदभोदन करण्यात येत आहे. (latest marathi news)

Adimayes wears a yellow colored Mahavastra and adorns it with golden ornaments.
Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगगडावर भाविकांसाठी ड्रेस कोड? लवकरच निर्णय होण्याचे सूतोवाच

ऐनवेळी उदभवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. न्यासाच्या धर्मशाळा, मंदिर, पहिली पायरी, प्रसादालय, भक्तांगण आदी ठिकाणांबरोबर पदयात्रेकरुना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ४ पाण्याचे टॅंकर सुरु केले आहे. यात्रेकरुंचे ऊन, वाऱ्या पासून संरक्षण व्हावे व विश्रांतीसाठी शिवालय तलाव परीसरात तीन हजारावर भाविक बसतील इतका मंडप टाकण्यात येत आहे.

मोफत प्रसादाचा घेतला लाभ

संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी ५० कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीनेही स्वच्छतेसाठी व पाणीपुरवठ्यास अग्रक्रम देत स्वच्छतादुतांची नेमणूक केली आहे. देवनळी, गंगा-जमुना कुंड, धोंड्या कोंड्या विहिरीची स्वच्छता करुन भाविकांना त्यातील पाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले आहे. दरम्यान, गडावर प्रसाद, हार, कुंकुची, हॉटेल व्यावसायिकांनी दुकानांची सजावट केली आहे.

तर परिसरातील आदिवासी बांधवांचीही गडाकडे येणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी हॉटेल, पुजा साहित्य, प्रसादाची विक्रीची दुकाने थाटण्यासाठी लगबग सुरु आहे. दरम्यान, शनिवार (ता. २०) पासून गडावर यात्रोत्सवाची खरी गर्दी सुरु होणार असल्याचा अंदाज आहे. न्यासाच्या प्रसादालयात गुरुवारी सुमारे सहा हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला.

Adimayes wears a yellow colored Mahavastra and adorns it with golden ornaments.
Saptashrungi Devi Temple : आदिमाया सप्तशृंगी मंदिरात 8 किलोची चांदीची कृष्णमूर्ती अर्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.