Nashik News : ‘पांजरपोळ’च्या 1600 गायींना प्रतिदिन 20 टन चारा! दुष्काळातही सेवाभाव वृत्ती कायम

Nashik News : नाशिक पांजरपोळ नावाने तीन ठिकाणी विस्तारलेल्या या गोशाळेतून शुद्धतेची हमी देणारे दररोज अडीच हजार लिटर दूध संकलित होते आणि घरोघरी पोचविले जाते
Cows in Nashik Panchvati Panjarpol Goshala opposite Nimani Bus Stand & Veterinary Officer inspecting cows in the cowshed
Cows in Nashik Panchvati Panjarpol Goshala opposite Nimani Bus Stand & Veterinary Officer inspecting cows in the cowshed esakal
Updated on

नाशिक : भीषण दुष्काळामुळे गुरांना चारा व पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यावर ओढवलेली असताना नाशिकमधील पांजरपोळ गोशाळेतील तब्बल १६०० गायींना दररोज २० टन हिरवा व कोरडा चारा पुरवला जात आहे. नाशिक पांजरपोळ नावाने तीन ठिकाणी विस्तारलेल्या या गोशाळेतून शुद्धतेची हमी देणारे दररोज अडीच हजार लिटर दूध संकलित होते आणि घरोघरी पोचविले जाते. वर्षाकाठी दहा कोटींचा आर्थिक भार सहन करूनही ‘पांजरपोळ’चे विश्‍वस्त १४६ वर्षांपासून आपला सेवाभाव अविरत जोपासत आहेत. (Nashik 20 tons of fodder per day for 1600 cows of panchavati Panjarpol)

निमाणी बसस्थानकासमोरील साडेतीन एकर जागेत नाशिक पंचवटी पांजरपोळ ही गोशाळा चालवली जाते. ४२६ गिर, देशी व जर्सी गायी आहेत. चुंचाळे शिवारातील साडेबाराशे एकरच्या पांजरपोळ प्रकल्पात दहा एकरमध्ये गोशाळा आहे. तिथे विविध प्रकारच्या ३७४ गायींचे संगोपन केले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ४० ते ५० गायी वाढतात.

पेठ रोडच्या पांजरपोळमध्ये सर्वाधिक ८०० गायी आहेत. पंचवटी आणि पेठ रोडमधील पांजरपोळच्या गोठ्यातील गायींचेच दूध काढले जाते. देशी व गिर गायींच्या दूध घरपोच पुरवले जाते. साधारणत: ५८ ते ६० रुपये लिटर दराने हे दूध मिळते. कै. प्रागजी मावजी जव्हेरी यांनी १८७८ मध्ये नाशिक पांजरपोळची स्थापन केली.

त्यांचा वारसा पुढे रामजी ऊर्फ गोरखभाई प्रागजी जव्हेरी यांनी समर्थ सांभाळला. १९९९ पासून गोशाळेची जबाबदारी हितेश ऊर्फ गोपाळभाई रामजी जव्हेरी यांनी हाती घेतला आहे. पांजरपोळ संस्थेत आठ प्रमुख विश्‍वस्त आणि २५ ते ३० त्यांचे सहकारी गोशाळेचा सांभाळ करत आहेत. वर्षाकाठी दहा कोटींचा तोटा सहन करूनही संस्थेने १४६ वर्षांपासूनची गोसेवेत कुठेही खंड पडू दिलेला नाही.

चुंचाळेमध्ये चाऱ्याचे नियोजन

चुंचाळे शिवारातील जागेत जैविक पद्धतीने शेती केली जाते. हिरव्या व कोरड्या चाऱ्याचे नियोजन येथूनच केले जाते. एप्रिल, मे व जूनपर्यंतचा चारा कुट्टी करून गोडावूनमध्ये साठवला जातो. पशुखाद्य, हिरवा व कोरडा चारा असा एकूण ३० किलो चारा सर्व गुरांना तीन टप्प्यात दिला जातो.

दररोज २० टन चाऱ्याचे नियोजन व्यवस्थापन विभाग करतो. याशिवाय दूध संकलन व वितरणाच्या नियोजनासाठी वेगळी टिम काम करते. गोठ्यांची स्वच्छता राखणे, शेण व गोमूत्र साठवण्याची स्वतंत्र व्यवस्था याठिकाणी केली आहे. डॉ. नीलेश शेलार हे गोठ्यातील जनावरांची नियमितपणे तपासणी करतात.

कॅल्शिअम, फॉस्फरसचे इंजेक्शन देणे, नियमित लसीकरण करून गोशाळेतील जनावरांची काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे दूध देणारे आणि दूध न देणाऱ्या जनावरांना एकाच प्रकारचे खाद्य मिळते. त्यांच्यात दुजाभाव होत नाही.   (latest marathi news)

Cows in Nashik Panchvati Panjarpol Goshala opposite Nimani Bus Stand & Veterinary Officer inspecting cows in the cowshed
Nashik NMC News : सिंहस्थाच्या नावाखाली ‘होऊ द्या खर्च’! गावठाण स्वच्छतेसाठी छोटी वाहने खरेदी करणार

गिर गायीचे तूप तीन हजार रुपये

देशी गाय व म्हशीच्या तुपापेक्षा गिर गायीचे तूप तीनपटीने महाग आहे. याचे कारण म्हणजे ३५ लिटर दुधापासून एक किलो तूप बनवले जाते. तूप तयार करण्याची पध्दत अगदी पारंपारिक ‘गुसळण’ची असल्यामुळे त्यात भेसळ होण्याची शक्यताच उरत नाही. शिवाय सहा दिवस दूध भिजत ठेवले जाते.

त्यामुळे गिर गायीचे तूप २२०० ते ३१०० रुपये किलो दराने विकले जाते. तूप काढल्यानंतर उर्वरित दूध हे पुन्हा बायप्रोडक्ट म्हणून न वापरता गायींनाच खाद्य म्हणून वापरत येते. शेणाद्वारे पुन्हा ते जमिनीत मिसळते म्हणून ‘जमिनीपासून जमिनीपर्यंत’ची जैव साखळी पूर्ण होते.

पांजरपोळची वैशिष्ट्ये

-गाईसाठी हेड टू हेड, टेल टू टेल आणि लूस हाउसिंग प्रकारचे तीन गोठे

-मुरघास साठवण्यासाठी ८० टनाचे सहा कट्टे

-गोडावूनमध्ये साठवला जातो महिन्याभराचा चारा

-लाळ खुरकत, घटसर्प, फऱ्या, थायलेरिया, ब्रुसेला आजारांचे नियमितपणे लसीकरण

-सेंद्रिय पध्दतीच्या शेतीमुळे गुरांचे शेण व गोमुत्राचा शेतातच वापर

-दूध देणारे व दूध न देणाऱ्या जनावरांना एकसारखाच चारा

-पाण्यासाठी स्वतंत्र दोन विहिर

Cows in Nashik Panchvati Panjarpol Goshala opposite Nimani Bus Stand & Veterinary Officer inspecting cows in the cowshed
Nashik NMC News : रस्ता खोदकामात केबल तुटल्यास बदलण्याची जबाबदारी ठेकेदाराची!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.