येवला : चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळत असून रोजच चढउतार होत असल्याने साठवलेला कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बाजारात हळूहळू लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. तसेच परराज्यातील कांदाही येण्याची शक्यता असल्याने शेतकरी कांदा विक्री होत आहे. कांदा यंदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलवत आहे. साठवलेला कांदा संपत आल्यावर उन्हाळ कांद्याच्या दराने सहा हजारांचा टप्पा पार केला आहे. (200 rupees reduction in summer onion price in district marathi )